
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
🔸 सर्व मंडळांनी असे सामाजिक उपक्रम राबविण्याची आवश्यता – गुरुदेव दुर्गोत्सव मंडळ
—————————————
अमरावती :-अंजनगाव सुर्जीतील माळीपूरा येथे गुरुदेव दुर्गोत्सव मंडळ द्वारे विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले.हिंदू धर्मातील स्त्री चे महात्म्य विषद करणाऱ्या नवरात्र उत्सव बरेच वर्षांपासून नित्यनेमाने साजरा करून सर्व जाती-धर्मांमध्ये सलोखा,एकोपा अबाधित राहावा याकरिता गुरुदेव दुर्गोत्सव मंडळ द्वारे विविध उपक्रमांचे दरवर्षी आयोजित प्रयत्न असतात.
या उपक्रमातील पहिला महत्वाचा उपक्रम म्हणजे विविध वयोगटातील नागरिकांसाठी बूस्टर डोज शिबिराचे आयोजन करण्यात आले असून २७ सप्टेंबर २०२२ मंगळवार रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत या शिबिराचा लाभ परिसरातील नागरिक घेऊ शकणार आहेत.दुसरा उपक्रम २९ सप्टेंबर २०२२ ला सायंकाळी ६ ते ७ गटनिहाय सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.या स्पर्धेतील क्रमांक पटकविणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस वितरण सुद्धा यावेळी करण्यात येणार असून वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांना प्रथम,द्वितीय,तृतीय अश्या तीन गटांमध्ये बक्षिसांची विभागणी करण्यात आलेली आहे.ह्या सामान्य ज्ञान स्पर्धेमुळे विद्यार्थ्याचे बुद्धी कौशल्य व लेखणी कौशल्य वाढण्यासाठी आयोजन करण्यात आले असे गुरुदेव दुर्गोत्सव मंडळ द्वारे सांगण्यात आले.तिसरा उपक्रम ३० सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत ठिपक्यांच्या रांगोळीला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.दिलेल्या १ तासांत आपले रांगोळी कौशल्य परीक्षकांना पूर्ण करून दाखवायचे आहे.रांगोळी स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांक पटकविणाऱ्यांना बक्षीस वितरीत करण्यात येणार आहे.यातील शेवटचा आणि महत्वाचा उपक्रम म्हणजे रक्तदान शिबीर.येणाऱ्या काळात रक्ताची कमतरता जाणवणार असली तर संयोजकांच्या कार्यामुळे रक्त उपलब्ध होण्याची योजना बनली आहे.रक्तदान शिबिराच्या कार्यातून वैश्विक समाजाची संकल्पना दृढ होत चालली आहे.गुरुदेव दुर्गोत्सव मंडळ द्वारे आयोजित केलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण दिनांक २ ऑक्टोबर २०२२ ला विठ्ठल मंदिर,माळीपूरा येथे होणार आहे.