
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- शहरात ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांचे मा. नगराध्यक्ष संजय गाढवे व जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ.संयोगिताताई गाढवे यांनी ज्योतीचे पुजन करुन स्वागत केले.कोरोनाचं संकट कमी झाल्यानंतर सण उत्सव निर्बंधांविना पार पडत आहेत. महाराष्ट्र निर्बंधमुक्त झाल्यानंतर विविध मंदिर खुली झाले आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडे तीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेलं तुळजाभवानी मंदिर आहे. भवानी ज्योत घेऊन येणारे भाविक विविध या ठिकाणी हून ज्योत घेऊन आले. त्यामध्ये कसबा येथील साहिल आप्पा गाढवे मित्र मंडळाने कर्नाटक मधील सौदंती याल्लामादेवी,लक्ष्मी नगर येथील मंडळाने श्री क्षेत्र काळूबाई (मांढरदेवी), निखील नगर,रामहरी नगर व शिवशंकर नगर,लक्ष्मी नगर येथील बाळासाहेब सुर्वे मित्र मंडळाने श्री क्षेत्र काळूबाई (मांढरदेवी),श्री क्षेत्र तुळजापूर येथून इंदिरा नगर या सर्वांनी पायी चालत नवरात्र उत्सव मंडळाच्या ज्योत शहारत भाविक घेऊन आल्यानंतर गाढवे दांपत्यासह परिवाराने पूजन करून जोरदार स्वागत केले.यावेळी न.प.सर्व नगरसेवक, विकासरत्न संजय नाना गाढवे प्रतिष्ठान,साहिल आप्पा गाढवे मित्र मंडळ, पदाधिकारी,सर्व भाविक भक्त उपस्थित होते.