
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:दिनांक 27.09.2022 रोजी 2 वाजताच्या सुमारास पो.स्टे मदनुर तेलंगाना येथील पोउपनि शिवकुमार यांनी पो. नि. सोहन माछरे पो.स्टे देगलुर यांना फोन वरून बिचकुंदा व जुक्कल हद्दीतुन जनावरे चोरुन टाटा टेम्पो 407 या वाहनातून घेवून जात आहेत सदर वाहनास आडवित असताना त्यातील चोरट्या इसमांनी मदनुर पोलीसांच्या वाहनावर दगडफेक करुन जिये घेणा हल्ला केला असुन सदर वाहन हे देगलुर शहराच्या दिशेने येत आहे बिचकुंदा व मदनुर येथील पोलीस त्याचा पाठलाग करीत येत आहेत पो.स्टे हद्दीत नाकाबंदी करून सदर वाहनास थांबविणे बाबत सांगीतले .सदर माहीती मिळाल्या वरुन पो.नि माछरे यांनी राजगस्त कामी असलेले अधिकारी पो.उप.नि श्रीकांत मोरे, व पोलीस अमलदार पोहेकॉ / 2462 ज्ञानोबा केंद्रे, पोहेकॉ / 2417 वचन करले, चालक पोना / 461 शेख जावेद, पोकों / 1788 सुधाकर मलदोडे, चालक पोकों / 2895 सुर्यकांत महाजन, पोकों / 3118 क्षितीज भोसले यांना माहीती दिल्याने त्यांनी देगलुर शहरात नाकाबंदी करुन नमुद वर्णनाचे वाहनास मदनुरनाका येथे थांबविण्याचा प्रयत्न केला असताना वाहन चालकाने त्याचे वाहन न थांबविता उदगीररोड ने भरधाव वेगात पळून गेले सदर वाहनाचा पोउपनि मोरे व त्यांचे सोबत चे अमलदार व तेलंगाना पोलीस यांनी पाठलाग करुन वाहन थांविण्याचा प्रयत्न केला असताना कारेगांव येथे जनावर चोरट्यांनी गतिरोधकावर चाहन थांबविण्याचा बाहाना करुन चोरट्यांनी त्यांचा टेम्पो रिव्र्व्हस घेवुन तेलंगाना पोलीसांच्या वाहनास धडक देवुन मरखेलच्या दिशेने पळ काढला त्या मुळे पो. नि माछरे यांनी पो.नि विष्णुकांत गुट्टे, सपोनि नामदेव मद्दे पो.स्टे मरखेल यांना माहीती दिल्याने सपोनि मद्दे व सोबत पो. कॉ. 3207 चंद्रकांत पांढरे, पो. कॉ. 258 ग्यानोबा केंद्रे यांनी मरखेल बसस्थानका जवळ नाकाबंदी करुन वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु नाकाबंदी तोडुन वाहन हाणेगांवच्या दिशेने गेल्याने पो.नि. विष्णुकांत गुट्टे व चालक पोहेकॉ 2448 मंगनाळे यांनी हाणेगांव येथे स्थानिकांच्या मदतीने मोठे वाहन ट्रेलर रोडवर आडवे लावुन नाकाबंदी केली. सदर चोरटे समोर थांबविलेले वाहन पाहून त्यांचे टेम्पो बळवून घेत असताना पो.स्टे मरखेल येथील पोलीस जिपला धडकुन चोरट्यांचा टेम्पो रोडच्या खाली गेला त्या वेळी टेम्पोच्या पाठलागावर असलेल्या पोलीसांनी टेम्पोतील इसमांना ताब्यात घेत असताना आंधाराचा फायदा घेवुन काही पाच चोरटे पळून गेले व त्यातील एक चोरटा नामे आरशद सुभानखान वय-32 वर्षे रा. गावरका जि. मेवात हरीयाना यास ताब्यात घेवुन 407 टेम्पो, टेम्पोत असलेल्या जनावरासह मुद्देमाल पोस्टे मदनुर तेलंगांना येथील एस.आय शिवकुमार यांच्या ताब्यात दिले. सदर घटने बाबत पो.स्टे मदनुर तेलंगाना येथे मदनुर पोलीसांवर जिवघेणा हल्ला केल्या बाबत तसेच जनावरे चोरी बाबत वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जनावर चोरट्यांचा पाठलाग करुन आरोपी व वाहन चोरल्या जनावरासह पकडुन देण्यास मदत केल्याने मा. बी. श्रीनिवास रेड्डी पोलीस अधिक्षक कामारेड्डी राज्य तेलंगाना व मा. प्रमोदकुमार शेवाळे पोलीस अधिक्षक नांदेड यांनी कामगीरी बद्दल पोलीस अधिकारी अमलदार यांचे विशेष कौतुक केले आहे.