
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
२६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर पर्यंत चालणार अभियान
जव्हार:-तालुक्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना माता ‘सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियांना अंतर्गत नवरात्री महोत्सवाच्या काळात सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आरोग्य तपासणी अभियानाची सुरवात केली आहे.शासनाच्या या आरोग्य तपासणी अभियानात १८ वर्षा वरील महिला,गरोदर माता,स्तनदा मतांसाठी २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर दरम्यान “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” मोहिमेच्या माध्यमातून सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या अभियानाची माहिती घरोघरी देण्यासाठी आरोग्य सुविधेचा शेवटचा घटक मानल्या जाणाऱ्या आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.वैद्यकीय अधिकारी यांच्या कडून या अभियानामार्फत महिला व मातांची तपासणी केली जाणार असून साखरेचे प्रमाण,हिमोग्लोबिन,एक्सरे,मधुमेह,रक्तदाब स्क्रिनिंग केली जाणार आहेत.गरोदर मातांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात आयोजित केलेल्या शिबिरांमध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी स्थानिक आशा कार्यकर्ती ह्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
“माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानाची जव्हार तालुक्यात सुरवात झाली आहे.१८ वर्ष वयोगटापासून पुढे सर्व महिलांनी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा उपकेंद्रात जाऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी.
डॉ.किरण पाटील,तालुका आरोग्य अधिकारी,जव्हार.