
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी .
कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप येथील शिवमुद्रा मित्र मंडळ करंजखोप सालाबाद प्रमाणे याही वर्षी उदे ग अंबे उदेचा गजर करीत शिवमुद्रा मित्र मंडळ करंजखोप यांच्यासह गावातील ग्रामस्थ माता,बहिणी भाविक भक्त नवदुर्गा मातेचा जल्लोषांत उत्सव साजरा करीत असतात. शिवमुद्रा मित्र मंडळ हे या वर्षामधील ९ व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे. शिवमुद्रा मित्र मंडळाच्या वतीने सांस्कृतिक धार्मिक अशा अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन मंडळाच्या वतीने तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थिंतीमध्ये आणि सर्व अध्यक्ष पदाधिकारी तसेच मित्रपरिवार अगदी जबाबदारीने आपली जबाबदारी नवरात्र उत्सवांमध्ये पार पाडत असतात. शिवमुद्रा मित्र मंडळाच्या वतीने अनेक उपक्रम नवरात्र उत्सवांमध्ये राबविले जातात. श्रावण महिना सुरु झाल्यापासून अनेक हिंदू सणांना सुरुवांत होते आपल्या देशांत साजरा होणाऱ्या अनेक सणापैकी नवरात्र उत्सव हा एक महत्वपूर्ण सण नवरात्री उत्सव हा मोठ्या उत्साहांत आणि आनंदाने संपूर्ण देशभरांत साजरा करण्यांत येतो. नवरात्री हा उत्सव नऊ दिवस चालतो आपल्या अनेक हिंदू सण आणि उत्साहीने पैकी नवरात्री या उत्साहांला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच कोरेगाव तालुक्यांतील करंजखोप या शिवमुद्रा मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवांमध्ये आणि उपक्रम राबवून तसेच संदेश देणारे विविध प्रकारचे देखावे सादर केले जातात. तसेच नवरात्री उत्सवांच्या काळामध्ये शिवमुद्रा मित्र मंडळाच्या वतीने वाठार पोलीस स्टेशनचे माननीय साहेब पोलीस निरीक्षक संजय बोंबले साहेब पोलीस उपनिरीक्षक संदीप जी बनकर साहेब यांच्यासह कोरेगांव तालुक्यांतील राजकीय,सामाजिक धार्मिक ,शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळींना आरतीचा मान दिला जातो. यावेळी आरतीच्या उपस्थित मान्यवरांचे करंजखोप ग्रामस्थ व शिवमुद्रा मित्र मंडळाच्या वतीने उपस्थिंत भाविक भक्तांच्या वतीने आरतीसाठी उपस्थित असलेले प्रमुख मान्यवरांचे भव्य स्वागत केले जाते. तसेच शिवमुद्रा मित्र मंडळाकडूंन नवरात्री उत्सवांमध्ये नऊ दिवस पोलीस प्रशासनांचे नियमांचे पालन करीत संध्याकाळी ९ ते ११ पर्यंतच गावांतील महिलांच्या उपस्थिंतीमध्ये गरबा ही खेळला जातो. यावेळी शिवमुद्रा मित्र मंडळाचे सर्वच मित्रपरिवार जबाबदारपणे आपले कर्तव्य पार पाडताना चांगले दिसून येत आहे. दरवर्षीच शिवमुद्रा मित्र मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांचे गावांमधून आणि परिसरांमधून चांगलेच कौतुक केले जात आहे. शिवमुद्रा मित्र मंडळाला करंजखोप गावांतील ग्रामस्थांचे तसेच राजकीय,सामाजिक शैक्षणिक ,धार्मिक अशा विविध मान्यवरांकडुंन प्रमाणे नेहमीच हातभार असतो. शिवमुद्रा मित्र मंडळ करंजखोप नवदुर्गा या होणाऱ्या नवरात्री उत्सवांनिमिंत्त राज्यांचे निर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभा विरोधी पक्षाचे नेते माननीय.अजित दादा पवार यांच्याकडूंनही शिवमुद्रा मित्र नवरात्र उत्सवानिमिंत्त या मंडळास सोशल मीडियावर शुभेच्छा देण्यांत आल्या.