
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
नांदेड : – जीवन जगत असताना अनेक माणसं म्हणताता आले माणसां माणसाप्रमाणे वाग माणुसकी सोडु नको पण या जगात अनेक माणसं आहेत जे की अजुनही माणुसकीच्या रेषेवर चालत माणुसकीचे दर्शन घडवताता तशीच एक घटना लोहा तालुक्यातील आहे दैनिक चालु वार्ताचे उपसंपादक गोविंद पवार एक वेळेस शिव फोटो स्टुडिओ मध्ये गेले असता तेथील संचालक मन्मथ वल्लम्पले म्हणाले सर माझ्या कन्येचा वाढदिवस आहे मी तो जोरदार साजरा करणार आहे असे यावेळी म्हणाले ते उपसंपादक गोविंद पवार यांनी सल्ला दिला कि अनावश्यक खर्च न करता तुमच्या कन्येचा वाढदिवस हा आश्रमशाळा , अंधविद्यालय , वृध्दाश्रम आशा ठिकाणी करा हे गोष्टी त्यांच्या तातडीनं लक्ष्यात आली व त्यांनी वाढदिवसाची तयारी पण केली.
दिनांक २७ सप्टेंबर रोजी लोहा येथील डॉक्टर हेलन केंद्र अंध विद्यालयात पानभोसी येथील वल्लम्पले कुटुंबीयांनी आपल्या लाडक्या कन्येचा वाढदिवस अंध विद्यालयातील विद्यार्थीच्या हस्ते कापुन साजरा केला. वाढदिवस साजरा झाल्यानंतर विद्यालयातील अंध विद्यार्थ्यांना जेवनाचा मेनु खिचडी व जिलबीचा आस्वादच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने देण्यात आला. हा वाढदिवस सामाजिक रित्या घेण्यात आल्याने या वाढदिवसाचा लोहा तालुक्यातील जोरदार बोलबाला ऐकायला मिळत आहे
या वाढदिवसाला रुची चे आई वडील महादेवी मन्मथ वल्लमपल्ले , आजा आजी रूक्मिणबाई आनंदराव वल्लम्पल्ले , काका परमेश्वर वल्लम्पले व भैया रूद्र वल्लम्पले यांची प्रमुख उपस्थिती होती. तर विद्यालयातील विशेष शिक्षक श्री नरेंद्र पंचबुध्दे सर, श्री. वाघमारे विजयकुमार, संजय हरगावकर, लक्ष्मण चव्हाण, धनंजय वडजे, गोविंद कस्तुरे व विद्यार्थीची प्रमुख उपस्थिती होती. अतिशय उत्साहात हा वाढदिवस साजरा करण्यात आला.