
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-प्रदिप मडावी
मनपा आयुक्त राजेश मोहितेंनी केली त्यांच्या वडिलाची लाखों रुपयांनी फसवणूक
आम आदमी पार्टी ने दिले त्यांच्या उपोषणाला समर्थन
चंद्रपूर
चंद्रपूर नगरीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका वरिष्ठ व जबाबदार अधिका-यांनी एका नागरिकाची फसवणूक केल्याची घटना चंद्रपूरात घडलेली आहे.सध्या ही बाब चंद्रपूरकरांसाठी चर्चेची झाली आहे. राज्याच्या लातूर जिल्ह्यातील लक्ष्मण राजेंद्र पवार नामक व्यक्तीच्या वडिलांकडून चंद्रपूर महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त राजेश मोहिते यांनी सन 2016 मध्ये मंत्रालयामध्ये असताना आश्रम शाळेला मान्यता मिळवून देतो असे म्हणून त्यांचे वडिलांकडून 14 लाख 70 हजार घेतले .काम न करून देता फसवणूक केल्याची कबुली लक्ष्मण राजेंद्र पवार या इसमाने केलेली होती .त्या संदर्भात त्यांनी आयुक्त राजेश मोहिते यांना दिलेली रक्कम परत करण्यासाठी अनेकदा तगादा लावला होता. परंतु वारंवार मागणी करून सुद्धा आपली रक्कम न मिळाल्याच्या नैराश्य भावनेतून लक्ष्मण पवार यांनी स्वतःवर चंद्रपूरात हल्ला करून घेतला होता हे सर्वश्रूतच आहे. यानंतर सदरहु प्रकरणाला गावभर चर्चेचे स्वरूप मिळाले होते .दरम्यान याच वेळी लक्ष्मण राजेंद्र पवार यांच्या वरती कायदेशीर पोलिस कारवाई झाली. मात्र मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी आजपर्यंत यावरती कोणतेही भाष्य केलेली नाही हे विशेष! संपूर्ण प्रकरण हे भ्रष्टाचाराचे असून त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहे. या संदर्भात आयुक्त मोहिते यांनी आपली बाजू मांडणे योग्य असताना त्यांनी आपली बाजू मांडली नाही. एका महिन्यानंतर मोहिते यांची सेवानिवृत्ती असून ते सध्या दीर्घ रजेवर गेले असल्याची शहरात चर्चा आहे .आपल्याला न्याय मिळावा म्हणून लक्ष्मण पवार हे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले आहे. त्यांचा उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे . या बेमूदत उपोषणाला आम आदमी पार्टीचे शहर सचिव राजू कुडे यांच्या नेतृत्वात समर्थन देण्यात आलेले आहे.या वेळी आपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान चंद्रपूरचे राजकीय पुढारी तथा जेष्ठ पत्रकार किशोर पोतनवार यांनी नुकतीच उपोषण मंडपाला भेट देत लक्ष्मण पवार यांचे उपोषणाला पाठिंबा दिला आहे.शासनाने अद्याप त्यांचे उपोषणाची दखल घेतली नाही.