
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-प्रदिप मडावी
गाडेगाव विरुर येथे नागरिकांना शासकीय योजनांबद्दल मार्गदर्शन
कोरपना तालूका गाडेगाव
कोरपना तालुक्यातील गाडेगाव विरुर येथे नागरिकांना विविध शासकीय योजनाबाबत मार्गदर्शन व माहिती देण्यात आली.शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा तसेच त्याकरिता गावातील सुशिक्षित युवकांनी पुढाकार घेऊन गावातील नागरिकांना मदत केली पाहिजे,तसेच गावातील शेवटच्या घटकांपर्यंत योजनेचा लाभ पोहचिण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी गाडेगाव विरुर येथे बोलताना केले.
यावेळी गावातील नागरिकांना संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय बाल संगोपन योजना,माझी कन्या भाग्यश्री, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, डाकघराची विमा योजना ,रेशन कार्ड बनविण्यासाठी लागणारे कागदपत्रे अश्या प्रकारच्या विविध प्रकारच्या शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष भारत चौधरी,शाम देवतळे,मनोहर झाडे,उंदरू बांदुरकर, मायाताई करमनकर,मुकेश नक्षिने,अंकुश काकडे,भिकाजी राजूरकर,विशाल खाडे,प्रकाश डवरे,राजू कोडापे,दिलीप बांदुरकर,विशाल कोंगरे,संदीप काकडे,सुरेखा राजूरकर, छबुताई मुठलकर,ज्योतीताई आवारी उपस्थित होते.