
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर वर कायदेशीर कारवाई करण्याची केली मागणी
चंद्रपूर
गोंडपीपरी तालुक्यातील गोजोली येथील शेतकरी श्री.गणपती सोनूले हे मागील अनेक वर्षांपासून शेती करत आहे,वन जमीनीवर अनेक शेतकरी मागील 40 वर्षांपासून शेती करत आणि त्याच्या जमीनी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे केसेस चालू आहे,दिनांक 1 आक्टोंबर 2022 रोजी धाबा येथील वनविभागातील अधिकाऱ्यांच्या आदेशाने संबंधित कर्मचारी यांनी श्री.गणपती सोनूले यांच्या शेतात जाऊन कापसाचे रोपडे उपडू लागले आणि याआदी लवकर जागा खाली करण्याचे यावेळी वन कर्मचाऱ्यांनी सांगितले होते,पण शेतात पीक असल्याने ते जागा खाली करू शकले नाही,श्री.गणपती सोनूले या प्रकरणा संदर्भात विचलित होऊन त्यांनी दिनांक 2 आक्टोंबर 2022 ला आपल्या शेतात काम करत असताना विष घेऊन आत्महत्याचे करण्याचे पाऊल उचले परंतु नशीब बलवान असल्याने त्यांचे जीव वाचले,परंतु मृत्यूशी झुंज देत असून त्यांच्यावर सामान्य जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे उपचार सुरू आहे,
या सर्व बाबीची माहिती माजी आमदार अँड संजय धोटे यांना मिळाली त्यांनी गोजोली येथे जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व सर्व घटनेची माहिती घेतली,या प्रकरणात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे यांनी वनमंत्री ना.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या कडे केली आहे.याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष बबन निकोडे,भाजपचे जेष्ठ नेते दीपक बोनगिरवार, साईनाथ मास्टे,सुहास मांडुरवार,भाजपचे नेते गणपती चौधरी,गणेश दहाळे,बंडू शेंडे,गोपाल पाटील शेंडे,मारोतराव शेंडे,सुनील सोनूले आदी उपस्थित होते.