
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी लोहा –
लोहा शहरातील कलालपेठ येथील जेष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त शिक्षक रोहिदास लक्ष्मण महाबळे वय ८० वर्ष यांचे दिर्घ आजारांचे दि. ५ रोजी दुपारी २ वाजता कलालपेठ येथील निवासस्थानी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, दोन सुना, नातू – नाती ,चार भाऊ ,दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. ते छायाचित्रकार विनोद महाबळे व सामाजिक कार्यकर्ते अनिल महाबळे यांचे वडील होते.
कालवश रोहिदास महाबळे यांच्या पार्थिवावर उद्या दि. ६ रोजी जुन्या लोहयातील कलाल पेठ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.