
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते तालुक्यातील बोरगाव(आ) येथील पुंडलिक पाटील बोरगावकर यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम असलेल्या श्रीहरी मोफत पिठाची गिरणीचे उद्घाटन व पूर्ण झालेली विविध 51 लक्ष रुपये कामाचे लोकार्पण काल गुरुवारी लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे व शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, बोरगावच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर असून गावच्या मूलभूत विकास कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नसून आगामी काळात बोरगाव गावात विविध विकास कामे माझ्या निधीतून करणार असून बोरगाव गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही आमदार शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष केशव भीमराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील ,खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम आण्णा पवार, सरपंच प्रतिनिधी पुंडलिक पाटील बोरगावकर, सरपंच कांताबाई हंकारे, उपसरपंच जयश्री पुंडलिक पाटील, संचालक सुधाकर सातपुते, चेअरमन नागेश खाबेगावकर, सिद्धू वडजे, सचिन शिरसागर ,अश्विनी कापुरे सह गावकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.