
दैनिक चालु वार्ता उल्हासनगर प्रतिनिधी – गुरुनाथ तिरपणकर
स्वातंत्र्य भारताच्या अमृत महोत्सव निमित्ताने ऐतिहासिक महान स्री शक्ती यांच्या देश सेवेच्या कारकिर्दीतील उजाळा व शतशः नमन लावणी साहित्य संमेलन ऑनलाईन नुकतेच पार पाडले यामध्ये लावणी कोरकमिटीच्या अध्यक्ष म्हणून सन्मा. प्रिया मयेकर मॅडम यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली , व आपली भूमिका चोख पणे पार पाडत त्या अध्यक्षिय भाषणात त्या म्हणाल्या लावणी साहित्य अश्लील नाही, लोकांनी त्याला वेगळ्या दृष्टिकोनातून पहाण्याचा प्रयत्न केला. पण आज आपल्या समूहातर्फे लावणी संमेलन व अनेक उपक्रम स्पर्धा राबवून लावणीकार साहित्यिक घडविण्यासाठी प्रयत्न करतं आहोत याचा अभिमान आम्हां सर्वांना वाटतो..! समूहाचे संस्थापक सन्माननीय योगेश चाळके सर यांनी कार्यक्रमाची सुरुवात ईशस्थवन गाऊन केली तसेच सूत्रसंचालनाची सूत्रे घेऊन पुढील लावणी संमेलनास सुरुवात केली .यामध्ये सहभागी लावणीकार डाॅ.रेखादेशमुख , सौ.किरण चौधरी ,सौ.सुरेखा वाडकर, सरिता पुसद ,राधा ओझा ,श्रीनिवास गडकरी ,सुमित्रा ताई,सौ.अंजली देशपांडे ,अंजुम शेख, करूणा शिंदे, सौ.विजया शिंदे, सौ सुरेखा गायकवाड, पांडुरंग सर, शिल्पा ताई-,कांबळे सर, किरण ताई, रेखा ताई, मेघना पाटील, योगेश चाळके सर, प्रिया मयेकर मॅडम या होत्या. या सर्वांच्याच लावण्या अतिशय सुंदर स्पष्ट व अर्थ पूर्ण मनाला चालणा देणा-या अशा होत्या. याबद्दल सर्वाचे मनापासून कौतुक योगेश चाळके सरांची गवळणनीने गवळण मय वातावरण झाले, तर दाजीबा मला शाळेला जाऊ द्या…या लावणीने शैक्षणिक ओढ निर्माण केली.साहित्यिक मेजवानी आॅनलाईन गाजली व ख-या अर्थाने लावणी म्हणजे एक नवी दिशा व आशा आहे. हे लावणीकार यांनी सिद्ध केले. खरे पहा सन्मा. योगेश चाळके सरांनी या देशासाठी नव दुर्गा स्वातंत्र्य साठी झटल्या त्यांना नमन करुन त्यांच्या महान ऐतिहासिक कार्याचा आढावा घेत, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा निमित्ताने नव दुर्गा सर्वांन समोर उभ्या केल्या…व महिला म्हणजे देशाची शान व खाण आहे. याच्या वर अन्याय झाले तर ते अशा देवीच्या नव रुपाने प्रकट होतात व देश रक्षणासाठी व स्वसंरक्षणासाठी हाती तलवार घेतात..! यात तिळमात्र शंका नाही..हे सरांच्या सूत्रसंचालनातून स्पष्ट झाले. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद आपण सहभागी होऊन आपले साहित्य या अखिल महाराष्ट्र साहित्य मंच लावणी समूह द्वारे एक प्रेरणादायी ठरले.असा विश्वास संपादन करून आभार प्रदर्शन मेघना पाटील यांनी केले व कार्यक्रमाची सांगता सांगता झाली..!