
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
कोरोना मुळे न होऊ शकलेले शैक्षणिक वर्ष 2021-22 चे विज्ञान प्रदर्शन या वर्षी ऑनलाईन घेण्यात आले आणि म्हसळा तालुक्याने यात सुद्धा भरीव योगदान देऊन विद्यार्थ्याच्या कल्पकतेला, वैज्ञानिक दृष्टिकोनाला चांगल्या प्रकारे चालना दिली असे गौरव उदगार या वेळी म्हसळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी संतोष दौड यांनी व्यक्त केले.
विद्यार्थी गट इयत्ता 6 वी ते 8 वी
प्रथम क्रमांक रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळवाडा चा विद्यार्थी प्रिन्स जयराम मोहिते मॉडेल विषय- मानवी श्वसन संस्थाप्रतिकृती ला जाहीर झाले तर द्वितीय क्रमांक रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोहिणी ची आदिती सखाराम अंबाजी मॉडेल विषय- कचऱ्याचे विघटन आणि व्यवस्थापन या प्रतिकृती ला आणि तृतीय क्रमांक रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरसई मराठी चा विद्यार्थी लावण्य प्रकाश शितकर मॉडेल विषय- आरोग्य आणि स्वच्छता यांना जाहीर झाले.
विद्यार्थी गट इयत्ता 9 वी ते 12 वी प्रथम क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा समर्थ मन्मथ निरणे मॉडेल विषय रोबोट. व्दितीय क्रमांक संयुक्त काळसूरी हायस्कूल विद्यार्थी सोहम अनंत कांबळी मॉडेल विषय- जलसंवर्धन वाहक वॉशिंग सेंटर आणि पांगळोली हायस्कूल विद्यार्थी आफाक धनसे मॉडेल विषय- इको फ्रेंडली बायो प्लास्टिक यांना तर तृतीय क्रमांक
अंजुमन हायस्कूल म्हसळा विद्यार्थी अब्दुल मोहित कमरोद्दीत बांगी मॉडेल विषय- स्मार्ट लाईट यांना जाहीर झाले.
शैक्षणिक साहित्य प्राथमिक शिक्षक गटात प्रथम क्रमांक रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळवाडा च्या सौ गुंडरे अश्विनी उमाकांत यांना, द्वितीय क्रमांक रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरसई मराठी चे जयसिंग बेटकर यांना तर तृतीय क्रमांक आयडियल इंग्लिश स्कूल म्हसळा शेख नार्गीस यांनी प्राप्त केला.
शैक्षणिक साहित्य माध्यमिक गट शिक्षक प्रथम क्रमांक काळसुरी हायस्कूल किरण चाळके, द्वितीय क्रमांक पीएनपी माध्यमिक शाळा पाष्टी चे बिलाल शिकलगार, आणि तृतीय क्रमांक पीएनपी माध्यमिक शाळा पाष्टी चे विनयकुमार सोनवणे यांनी मिळवला.
सदर विज्ञान मॉडेल परीक्षक म्हणून तळा येथील शिक्षक प्रमोद भांजी, माणगांव मधील शिक्षक रुपेश गमरे, कांबळे सर, प्रा. सलमा नाजिरी, प्रा शिरीन यांनी काम पहिले.
वरील विजेत्या सर्व विद्यार्थी,शिक्षक व शाळांचे तसेच सहभागी सर्व विद्यार्थी यांचे गटशिक्षणाधिकारी संतोष दौड, शिक्षण विभाग पंचायत समिती म्हसळा व गणित विज्ञान अध्यापक मंडळ म्हसळा अध्यक्ष विनयकुमार सोनवणे, उपाध्यक्ष जयसिंग बेटकर, सचिव खेडेकर सर, सह सचिव सुनीता भोसले, कोशाध्यक्ष देवगावकर, रमेश जाधव, परीक्षा समिती सदस्य किरण चाळके, तांबे सर, अली सर, साधनव्यक्ती दीपक पाटील, नंदकुमार जाधव आणि संपूर्ण तालुका कार्यकारणी यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व पुढील होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व सहभागी ना लवकरकच सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल आणि विजेत्या स्पर्धेकाना चालू वर्षाच्या विज्ञान प्रदर्शन मध्ये सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल असे शिक्षण विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले.