
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
गेल्या दहा वर्षापासून इंदापूर तालुक्यामध्ये सामाजिक कार्य करणारे आणि सामाजिक कार्यातून आपली ओळख निर्माण करणारे विकास शिंदे यांची माळी महासंघ पुणे जिल्हा ग्रामीण च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महाराष्ट्र, जिल्हा, तालुका भरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. २०१० सालापासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे तसेच कोरोना सारख्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला आणि आबालवृद्धांना आरोग्य सेवा देण्यासाठी आपल्या स्वतःच्या जीवाची परवा न करता त्यांनी काम केले आहे, त्यामुळे त्यांची आरोग्य दूत म्हणून सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे.
गेल्या दहा वर्षापासून ते इंदापूर शहराबरोबरच इंदापूर तालुक्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत, त्यांनी आजपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या अनुदानित योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. तसेच ते अन्यायाविरुद्ध लढ्याच्या ग्रुपच्या माध्यमातून चुकीच्या ठिकाणी समाजात आवाज उठवत आहेत.विकास शिंदे हे सध्या सोशल मीडियावर यूट्यूब च्या माध्यमातून अंधश्रद्धेच्या विरोधात व समाज प्रबोधन करत आहेत.तहसील कचेरी सर्कल ऑफिस आणि दवाखान्यात चुकीच्या ठिकाणी प्रत्येक वेळी आवाज उठवला आहे.दोन महिन्या पूर्वीच त्यांची रयत शिक्षण व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली.व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विकास शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थींना शालेय गणवेश शिलाई मध्ये ३० टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना सढळ हाताने मदत करणारा प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा राजकारण आणि समाजकारण याचा समतोल साधणारे विकास शिंदे यांची माळी महासंघ पुणे जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
या सामाजिक कार्यामध्ये त्यांच्या पत्नी सौ. अंबिका शिंदे यांचा देखील सहभाग आहे. त्या देखील रयत शिक्षण संस्थेच्या सदस्य आहेत. विकास शिंदे यांच्या निवडीबरोबरच गणेश सुरेश राऊत सचिव व निखिल शिंदे यांची सहसचिव. बिबीशन देवकर सदस्य, गणेश राऊत सदस्य इंदापूर युवक तालुका आघाडी पदी नियुक्ती लावण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे, प्रदेश महासचिव चंद्रकांत वाघोले, अण्णा गायकवाड, मुंबई हायकोर्टाचे नामांकित ॲड. नितीनजी राजगुरू, इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे सरचिटणीस बापूसाहेब बोराटे, राहूल भुजबळ पुणे यांनी अभिनंदन केले.