
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
जीवनातील भौतिक संसाधन व जे जे काही प्राप्त होण्याचा जो मार्ग आहे तोच मार्ग परतीचा आहे म्हणून सत्याच्या मार्गे ने मिळाल तर अखंडित टिकत.आणि असत्याच्या मार्गाने मिळवलं तर याच पद्धतीने संपुष्टात येत फक्त यामध्ये पात्र बदलतं म्हणून मिळण्याचा मार्ग हाच टिकणयाचा मार्ग असतो .निसर्गाच्या रचनेत किंवा आपल्या जीवनात प्रत्येक बाब हि ज्या पद्धतीने आली आहे .त्या पद्धती वरच ती बाब टिकुन रहण्याचा कालावधी अंवलबुन असतो.महणजे येण्याची पद्धत टिकण्याचा कालावधी ठरवतं असते.महणुन जे काही मिळवायचं असेल ते मिळवताना निति धर्म न्याय यावर लक्ष असलं पाहिजे.कारण आपण दुर्लक्ष केले तर मग मात्र निसर्ग योग्य वेळी लक्ष देतो . हे वास्तविक सत्य आहे. सत्य स्वीकारणं किंवा मान्य करण हा मानवी स्वभाव नाही.खुप कमी लोक आहेत जे सत्य स्वीकारतात आपण चुकलोय किंवा चुकतोय हे तरी त्यांच्या लक्षात येतंय आपण ज्या मार्गावर चालत आहेत तो योग्य कि अयोग्य हे लोकांच सोडा आपल्या स्वतःला योग्य पद्धतीने महित पाहिजे.आपण मुल्यमापन करून बदल केला तर योग्य नाही तर शेवटी निसर्ग हा प्रत्येक बाबीच मुल्यमापन करून योग्य वेळी योग्य फळ देत असतो . म्हणून आपल्या जीवनात जी गोष्ट ज्या पद्धतीने आपल्याला मिळाली आहे ती त्याच पद्धतीने आपल्या सोबत आपल्याकडे राहणार आहे.हे ञिकाल सत्य आहे.महणुन निसर्गाने आपल मुल्यमापन करण्या अगोदर आपल्याला बद्दल स्वीकारता आला पाहिजे. आपल्याकडे पाऊस पडतो अगदी मुसळधार पडतो . ज्या वेगाने गतीने पाऊस पडतो. त्याच गतीने पाणी पण निघुन जात . गडगडाटी वादळी पाऊस असेल तर पाणी सुद्धा त्याच पद्धतीने वाहुन जात . आणि शांत संयमी स्थिर पाऊस असेल तर पाणी संथ गतीने वाहते.महणुन गती आणि स्थिती याला जीवनात खुप आणि अनन्यसाधारण असं महत्व आहे. पद्धतीने जे मिळालं आहे त्याच पद्धतीने ते टिकत आणि परत हि जात हा निसर्गाचा अखलित नियम आहे .आपण जी गोष्ट मग ते काही असो धन, पद,संपदा, नावलौकिक पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सुख दुःख आनंद, समाधान,वगैरे वगैरे हे आपण ज्या पद्धतीने मिळवलं आहे,हे त्याचं पद्धतीने टिकते . किंवा परत जाते .म्हणजे मेहनतीने कष्टाने नितिने , संयमाने कमवल मिळवलं तर ते संयमाने अंखडित टिकुन रहत .आणि बेइमानी, लबाडी, चलाखी ने मिळवलं असलतर ते त्याच पद्धतीने जात . म्हणजे बाब कोणतही असो ज्या मार्गाने आली त्याच मार्गाने परत जात असते . म्हणून आपल्या जीवनातील कोणतीही गोष्ट येण्याचा मार्ग हा नक्कीच चांगला योग्य धर्माचा असलाच पाहिजे.जीवन जगताना आपण खूप गांभिर्याने लक्ष ठेवून नसतो . म्हणून बर्याच गोष्टी ह्या आपल्या सोबत आपल्या बाबत घडल्या तरी सुद्धा आपल्या लक्षात येत नाही .किंवा त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो .पण आपण जर खरया अर्थाने मुल्यमापन केले तर मग मात्र सत्य बाब आपल्या लक्षात येते.पण स्वतः च मुल्यमापन कोणीही करत नाही किंवा मुल्यमापन म्हणून आपण पाहत नाही. खुप कमी लोक स्वतःच मुल्यमापन करत असतात.जयाला स्वतःच मुल्यमापन करता आलं त्याला या सगळ्या परस्थिती मध्ये योग्य मार्ग काढता येतो . म्हणून अखंडित टिकुन राहिल याच मार्गाने प्रत्येक गोष्ट मिळवली पाहिजे मिळवणं सोपं असतं टिकवण अवघड असतं म्हणून मिळविण्यासाठी योग्य मार्ग अंवलब करा
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301