
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर( दि.०७) स्पर्धा परीक्षा विश्वातील अतिशय कमी वेळेत नोकरीचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या देगलूर येथील परिवर्तन अकॅडमीने यशाचा शिखर गाठला. परिवर्तन अकॅडमीच्या पहिल्याच बॅचचे तब्बल पाच विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.ज्यातून चार (एम. एस.एफ.) तर एकभारतीय सेनेत दाखल झाले आहेत.शेख मोइज (एम.एस.एफ),ज्ञानेश्वर शिरगिरे (एम.एस.एफ) साईनाथ कासलवार(एम.एस.एफ) शेख असिफ (एम.एस.एफ) तर श्रीकांत मठदेवरु हे भारतीय सेनेत दाखल झाले आहेत.नुकताच जाहीर झालेल्या निकालाने परिवर्तन अकॅडमीचे संचालक प्रा.इर्शाद पटेल सर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोठ्या शहरातील शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून पुणे व लातूरमध्ये शिकवल्यानंतर देगलूर मध्ये स्पर्धा परीक्षा मुलांना शिकवायला सुरुवात केली.ज्याचा धडाकेबाज निकाल जाहीर झाला आहे.ज्यातून पाच विद्यार्थ्यांनी आपल्या नोकरीचे स्वप्न पूर्ण केले आहे.आज झालेल्या सत्कार समारोहात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून (पी.ओ.सी) चे संचालक प्रा.मूबीन सर,पत्रकार हबीब रहमान तथा सामाजिक कार्यकर्ते इमरान भाई हे उपस्थित होते.शिवाय प्राध्यापक मुबीन सरांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट असे मार्गदर्शन करीत तुम्ही परिवर्तन मध्ये आहात म्हणजे तुमचा यश निश्चित आहे असे व्यक्त केले तर पोलिस उपनिरीक्षक मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अत्यंत कमी वेळेत परिवर्तन अकॅडमीने दिलेल्या या निकालाबद्दल अभिनंदन व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार इरशाद पटेल यांनी केले,तर सर्व नियोजन व्यवस्थापक सज्जाद पटेल यांनी केले.असंख्य विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.यावेळी अत्यंत उत्साहात हा सत्कार समारोह देगलूर येथील गांधी चौकातील परिवर्तन अकॅडमी येथे पार पडला.