
दैनिक चालू वार्ता म्हसळा – प्रतिनिधी अंगद कांबळे
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा म्हसळाच्या महिला आघाडी प्रमुख तथा रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी लि पेण संचालिका सौ सुमित्रा खेडेकर व त्यांचे पती समाजसेवक श्री विलास खेडेकर यांनी आपल्या निवासस्थानी विना मोबदला दिलेल्या जागेत संघटना कार्यालयाचे उद्घाटन दसरा निमित्त मोठ्या उत्साहात पार पडले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुका शाखेच्या अध्यक्षा सौ. शुभदा दातार तसेच प्रमुख उपस्थिती अखिल रायगड प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष श्री किशोर मोहिते, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख श्री विलास यादव, दिलीप करंबे , श्री सुनील उमरोटकर,श्रीम पुष्पलता तांबट, श्री अनंत येलवे गुरुजी, जेष्ठ पत्रकार श्री संजय खांबेटे, प्रा. महंमद शेख सर,प्रा अंगद कांबळे, माध्यमिक शिक्षक संघटना अध्यक्ष श्री नितीन पाटील, समाजसेवक श्री अनिल पोतदार, श्री विलास खेडेकर उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.यानंतर प्रमुख मार्गदर्शक अखिल रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष श्री किशोर मोहिते यांनी या प्रसंगी मनोगतात आपल्या अडचणी सोडवायच्या असतील तर आपल्याला एकत्र येणे ही काळाची गरज आहे. समविचारी व्यक्ती ,संस्था एकत्र येऊन विकसित समाज घडविण्यासाठी प्रयत्न करतात.त्याला संघटन असे म्हणतात. आपण जर एकसंघ झालो तर आपल्या ज्या महत्वाच्या मागण्या आहेत त्या आपल्या पदरी पाडून घेऊ शकतो त्यासाठी संघटना असणे गरजेचे आहे. अखिल भारतीय प्राथिमक शिक्षक संघ ही संघटना संपूर्ण देशात काम करत आहे.संघटना शिक्षकांच्या न्याय हक्कासोबतच आपले कर्तव्य, जबाबदारी यासोबतच शिक्षकांना शैक्षणिक प्रशिक्षण,सेमीनार, संघटनेचे खर्चाने करते असे सांगितले आपले तालुक्यातील म्हसळा नगरपंचायत व चिखलप येथील शिक्षिका निवासस्थान पूर्णपणे नादुरुस्त असून संबंधित जागेवर अतिक्रमण होत आहे. तरी तेथे नवीन ईमारत बांधून मिळणे साठी पत्रव्यवहार करणेत येईल.तालुक्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, येणाऱ्या समस्या या संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
जेष्ठ पत्रकार तथा सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्री संजय खांबेटे व प्रा महंमद शेख यांनी संघटनेचे कार्याबद्दल समाधान व्यक्त केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व यापुढे सहकार्य करणेची ग्वाही दिली.
संघटनेचे मार्गदर्शक तथा सेवानिवृत्त शिक्षक श्री विलास यादव व सुनील उमरोटकर यांनी आपल्या भाषणात आपली संघटना 1910 मध्ये स्थापन झालेली आहे. संघटनेला दोंदे घराण्याचा वारसा लाभला आहे,आचार्य दादासाहेब दोंदे , अरुणभाई दोंदे आणि सुलभाताई दोंदे यांनी यासाठी त्यागपूर्ण जीवन जगले त्यांच्या काळातील आठवणी सांगितल्या.श्री करंबे गुरुजी यांनी ही संघटना पदाधिकारी चांगले काम करत असल्याने शुभेच्छा दिल्या. संघटनेचे माजी सल्लागार श्री येलवे गुरुजी यांनी मनोगत व्यक्त करताना संघटना वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन आपल्या समस्या निराकरण करणेसाठी कार्यालयाची नितांत गरज होती ती आज पूर्ण झाली याबद्दल समाधान व्यक्त केले. संघटनेच्या अध्यक्षा सौ दातार मॅडम यांनी ही संघटनेच्या ध्येयधोरणा नुसार काम करुन शिक्षकांच्या अडचणी सोडवू अशी ग्वाही दिली सर्वात जूनी संघटना असून कार्यालय चालू करण्याचा योग माझ्या कार्यकाळात आला याबद्दल मी भाग्यवान आहे असे सांगितले.
ही संघटना केवळ शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी झटत नसून विद्यार्थी विकासासाठी चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा सारखे उपक्रम तसेच शाळांना विविध उपक्रमात मदत करणे,व्यक्तिमत्त्व विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असते असे प्रतिपादन श्री.संघटना सचिव श्री.रमेश जाधव यांनी केले.
संघटनेच्या सभासद इंदिरा चौधरी यांनी रांगोळीचे माध्यमातून संघटनेचा लोगो काढून सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. खेडेकर मॅडम यांनी केले तर सूत्रसंचलन श्री रमेश जाधव यांनी केले कार्यक्रमाचे आभार अभिनेते श्री शशिकांत भिंगारदिवे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष श्री विजय घाटगे,समीर पास्टे, सुनील साठे, भानुदास राठोड, शिवाजी चव्हाण, नागेश शेवडीकर,प्रवीण सोनवणे, विपुल चक्करवार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.