
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -मानिक सुर्यवंशी
मौजे सुगाव येथे आज 7/10/2022 .रोजी अशोक व्यंकटराव नरवाड यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली. आणि ग्रामपंचायत कार्यालय सुगाव येथे त्यांचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले. *यावेळी सुगाव नगरीचे सरपंच मोहित माधवराव पाटील सुगावकर* , ग्रामपंचायत सदस्य पदमीनबाई भास्करराव बामणे, गोदावरीबाई माधवराव पाटील, माणिक भीमराव सोनकांबळे, वचलाबाई मारुती कांबळे, भुमाबाई हैबती मेकले, गावातील प्रतिष्ठित नागरिक नामदेव पाटील कावळगड्डे, बालाजी पाटील कावळगड्डे, गजानन रामराव बामणे, अर्जुन सोनकांबळे, ग्रामसेवक के.स गर्जे आधी उपस्थित होते. संपूर्ण गावातील त्यांना अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.