
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : शिंदे फडणवीस सरकारला 100 दिवस पूर्ण झाले. या मंत्रीमंडळात भाजपच्या 10 तर शिंदे गटाच्या 10 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. यांत अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालय सांभाळणारे मंत्री म्हणजे संजय राठोड .
नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणारे संजय राठोड पुन्हा एकदा त्यांच्या ट्वीटर अकाउंटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण गेले तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदें यांनी बंड केलं होतं त्यावेळी तेव्हा शिवसेनेचे आमदार संजय राठोड शिंदे गटात सामिल झाले.
त्यानंतर खातेवाटपा दरम्यान संजय राठोड यांना मंत्रीपद देण्यात आलं. त्यावरुनही राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होत. पण आता पुन्हा एकदा संजय राठोड चर्चेत आले आहेत ते त्यांच्या ट्वीटर अकाउंटमुळे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्री पदावर असताना आणि शिंदे गटाचा भाग असतानाही संजय राठोडांच्या ट्वीटर वॉलवर शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसेना आदित्य ठाकरेचा फोटो दिसुन येत आहे. या फोटोमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ झाली आहे.
ट्वीटर वॉलवर उध्दव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंचा फोटो कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खुद्द आपल्याकडे 40 आमदार असल्याचा दावा करत आहेत पण त्यापैकी फक्त आमदारचं नाही तर थेट मंत्री पद उपभोगणारे संजय राठोड यांच्या ट्वीटर वॉलवर उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरेंचा फोटो का असा प्रश्न उपस्थित होतं आहे.