
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार:- नांदेड जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी व ज्येष्ठ नागरिक संघटना तालुका कंधार ची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत कंधार तालुका राष्ट्रवादी काँग्रेस जस्ट नागरिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेले आनंदराव गंगाराम किडे माणूसपुरीकर यांचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष हमीद सर यांचे हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन करण्यात आला. यावेळी संघटनेचे सचिव शंकरराव गोरे, एस पी जाधव ,गुलाम मुक्तार साहेब ,पठाण साहेब , परबतराव केंद्रे ,बिके वाघमारे आधी पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी शासनाने 75 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सोय केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन करण्यात आले
तसेच एसटी महामंडळ यांनी देखील साठ वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के प्रवास सवलत द्यावी
तसेच संघटनेतर्फे 80 वर्ष पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कार करण्याचेही यावेळी ठरविण्यात आले
प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालय कंधार येथे बैठक संपन्न झाली.