
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर तालुक्यामध्ये एक ज्येष्ठ समाज सुधारक म्हणून नावलौकिक असलेले अर्जुन (बापू) बनसोडे यांचे काल दि. ९/१०/२०२२ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण गौतोंडी गावासह पंचक्रोशी मध्ये शोककळा पसरली आहे.
कचरवाडी गावचे सलग चार वर्ष सरपंच पद भूषवलेले कचरवाडी गावात नागरिकांची दवाखान्या अभावी गैरसोय होत होती. तर त्यांनी स्वतःच्या मालकीची जागा दान म्हणून सरकारी हॉस्पिटल बांधण्यासाठी दिली त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय या कार्यक्षेत्रात मोलाचे योगदान होते. त्यांना संपूर्ण तालुक्यामध्ये आदराने बापू या नावाने ओळखले जायचे त्यांनी गोतंडी नजीक गौतमेश्वर प्राथमिक शाळा सुरुवातीस उभारणीसाठी अतोनात प्रयत्न करून त्यांनी तिथे शाळा उभारली.
त्यांनी समाजासाठी आपले जीवन आमर्पित केले होते. असे कोजागिरीच्या लखलखत्या प्रकाशमय झोतात त्यांची आज प्राणज्योत मालवली तसेच ते इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तामामा भरणे यांचे वडील विठोबा तात्या भरणे यांचे जवळचे मित्र होते.