
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी -कवि सरकार इंगळी
पुणे – कालकथित.श्रीराम पुजांजी भरणे व शहीद सावळदास भरणे यांच्या स्मरणार्थ संत गाडगेमहाराज साहित्य विचार मंच महाराष्ट्र व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक मंच महाराष्ट्र पुणे जिल्हा मांजरी विभाग व आवाज नवोदित भीम साहित्यिकांचा साहित्य मंच संयुक्त विद्यमाने आयोजित
,स्वातंत्र्य महोत्सव , धम्म चक्र प्रवर्तन दिन व अश्विन पौर्णिमा निमित्त राज्यस्तरीय कविसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम
दिनांक 9/10/2022 रविवार रोजी
सम्राट अशोक बुद्ध विहार काळेपडळ रोड हडपसर येथे
मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी कार्यक्रम अध्यक्ष आ.ऍड.महेंद्र कुमार गायकवाड (संस्थापक एल्गार साहित्य सामाजिक संस्था,पुणे) यांनी बोधीवृक्षाचे वृक्षारोपण केले.यावेळी प्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक व प्रसिद्ध गायक उपस्थित होते.
यामध्ये मा.सिताराम नरके संस्थापक ज्ञानाई फाऊंडेशन पुणे ,मा.विनोदजी अष्टूळ संस्थापक साहित्य सम्राट पुणे ,मा.रणजित दादा पवार संस्थापक संत गाडगे महाराज साहित्य विचार मंच महाराष्ट्रराज्य , मा.बाळासाहेब काळे (जेष्ठ विचारवंत )मा.हणुमंत क्षीरसागर संस्थापक आवाज नवोदित भीम सहित्यिकांचा साहित्य मंच ,मा.कैलास थोरात अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ निर्मल टाऊनशीप व आ.कविता ताई काळे जिल्हाध्यक्षा डाॅ बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र मांजरी विभाग पुणे उपस्थित होते…मा.बबन धुमाळ, मा.उमा लुकडे, मा.नानाभाऊ माळी,मा.शुभांगी शिंदे, मा.किशोर टिळेकर,मा.सूर्यकांत नामुगडे,मा.सुनिल कांबळे, मा. शुभम चांदणे,मा.नंदा गाडे,मा.सुजाता नाणेकर ,मा.राहूल पवार,मा.भारती मोरे,मा.रविंद्र धसाडे,मा.उत्तम धिवार,मा.प्रतिभाताई मनवर,मा.अंजू वरठे,मा.कविता चव्हाण गायिका , आ.सुभा लोंढे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, मा.दिवेलकर ताई ,मा.उषाताई भरणे,मा.मोहिते भरणे आ.गुणवंत वरठे सेवानिवृत्त डीवायएसपी राज्य राखीव पोलीस दल अशा दिग्गज कलाकार व साहित्यिक यांची उपस्थिती होती ….कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आ.कविता ताई काळे यांनी केले व आभार प्रदर्शन आ.कांचन मून यांनी केले सुंदर कविता व गीत सादरीकरणाचा बहारदार कार्यक्रम पार पडला..आ.भारती मोरे यांनी संविधान वाचन केले..उपस्थित प्रत्येकांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये लेखक रणजित पवार लिखित, पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ममता पैलवान हे पुस्तक आयोजक कांचन मून यांनी स्वखर्चाने प्रत्येकांना भेट देऊन एक आदर्श निर्माण केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कांचन मून,कविता काळे व भरणे परिवारांनी अधिक परिश्रम घेतले.