
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
उमरगा लोहार मतदारसंघाचे व काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ बी पी गायकवाड यांच्या माझी संघर्षगाथा आत्मकथा या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा त्यांच्या 72 वाढदिवसा निमित्ताने यश लॉन्स, बिबेवाडी, पुणे येथे प्रकाशित करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. उल्हास दादा पवार जेष्ठ काँग्रेस नेते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. रत्नाकर गायकवाड मा. मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य , डॉ बुधाजी मुळीक कृषीमहर्षी, डॉ यशवंत पाटणे साहित्यिक व विचारवंत होते तर प्रमुख उपस्थिती डॉ बबन जोगदड यशदा, पुणे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित पारपडले डॉ एस पी गायकवाड व इतर मान्यवरानी आपल्या मनोगतातून डॉ साहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला या वेळी उपस्थित डॉ शितल चव्हाण, व्यंकट भालेराव, डॉ अभिजित गायकवाड, डॉ निखिल गायकवाड, श्री बबन सूर्यवंशी श्री व्यंकट कल्याणकर, व मोठ्या संख्येने आप्तेष्ट उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री अनिल गुंजाळ यांनी केले तर आभार सौ सुनीता व्यंकट भालेराव यांनी केले