
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी- आकाश माने
जालना नगर परिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर व्हावे या मागणीसाठी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या जालना शाखेच्या वतीने जागर महापालिकेचा असे लक्षवेधी आगळेवेगळे आंदोलन मामा चौकामध्ये सुरू केले आहे. या आगळ्यावेगळ्या आंदोलनात शिवसेना उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनरावजी खोतकर यांनी आज दिनांक 11 ऑक्टोंबर 2022 रोजी भेट दिली व आपली मागणी योग्य असून लवकरच आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन जालना नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहोत .असे आश्वासन दिले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोषराव मोहिते मराठा महासंघाचे अशोक पडुळ हिंदू महासभा आंदोलनाचे प्रमुख धनसिंग सूर्यवंशी व त्यांचे सहकारी उपस्थित होते. ======================