
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
सर्पमित्र साईनाथ देवपाठक यांनी पुन्हा एकदा मानवतेचे दर्शन घडवले असुन पांगरी शिवारात भला मोठा दहा फुटाचा महाकाय अजगर आढळून आला असुन या अजगरास पकडण्यात सर्पमित्र साईनाथ देवपाठक यांनी जिवाची बाजी लावून हा अजगर पकडुन वन विभागाच्या स्वाधीन केला आहे.
पांगरी येथील शेतकरी सूर्यकांत रामराव बुद्रुक यांच्या शेतात त्यांच्या कुटुंबातील चुलती सौ. सयाबाई कुशेबराव बुद्रुक या जनावरासाठी वैरण , चारा घेण्यासाठी गेल्या असता वैरण चारा कापते वेळी त्यांना अचानकपणे भला मोठा अजगर जातीचा भला मोठा साप आढळून आला त्यावेळी सौ.सयाबाई यांनी आरडाओरड केली. भला मोठा अजगर पाहताच क्षणी त्या बेशुद्ध अवस्थेत पडल्या त्यांचा आवाज आवाज ऐकून त्यांचे पती कुशेबराव बुद्रुक यांनी जागेवर जाऊन पाहिले असता त्यांच्या पत्नी बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या पाहून त्यांनी आजुबाजूला पाहिले असता त्यांना भाला मोठा दहा फुटांचा अजगर सापावरती लक्ष गेले कुठल्याही क्षणाचा विलंब न करता त्यांनी बाजुलाच असलेले शेतकरी व त्यांचे पुतणे श्री सुर्यकांत रामराव बुद्रुक व राम बालाजी बुद्रुक यांना आवाज देऊन जागेवर बोलून घेतले. त्यांनी सुद्धा धावत पळत जवळ गेले आणि हा अजगर जातीचा भला मोठा साप पाहून तेही घाबरून गेले घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी पांगरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा सत्कर्म प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष त्र्यंबक बुद्रुक पाटील यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला व भल्या मोठ्या अजगराची सुचना दिली यावेळी त्यांनी कसल्याच प्रकारचा विलंब न करता त्यांनी तात्काळ त्या कार्याची दखल घेत त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला गांभीर्याने लक्ष देत वनरक्षक घुगे साहेब व नारायण शेवडीकर साहेब यांनी तातडीने सर्पमित्र साईनाथ देवपाठक यांना सोबत घेऊन यांच्या मदतीने पांगरी येथील घटनास्थळी आले यावेळी सर्पमित्र साईनाथ देवपाठक यांना या अजगराला पकडण्यात आले. दहा फुटांचा अजगर पकडुन वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केला यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आणि त्या अजगराला जिवदान दिले. अजगर जातीचा साप हा पांगरी येथे पहिली वेळेस निघाल्यामुळे घटनास्थळावरती अजगर पाहण्यासाठी भल्या भल्या लोंकाची तोबा गर्दी जमली होती. यापुढे साप दिसल्यास त्यास न मारता वनविभाग किंवा सर्पमित्रास कळविण्याचे आवाहन सर्पमित्र साईनाथ देवपाकठ यांनी यावेळी केले आहे.