
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
दि.९/१०/२०२२ कोजागिरीच्या लखलखत्या प्रकाशमय झोतात. गोतोंडी गावचे जेष्ठ समाजसुधारक अर्जुन बापू बनसोडे(वय वर्षे ७६) यांचे निधन झाले होते.निधन झाल्याचे कळताचं मा.राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी आज भर पावसात बनसोडे कुटुंबीयांची घरी जाऊन त्यांची मुले तात्याराम व अशोक बनसोडे सर व नातवंडांचे व सुनांचे सांत्वन करून त्यांना आधार दिला.
अर्जुन बापू बनसोडे हे इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय मामा भरणे यांचे वडील विठोबा तात्या भरणे यांचे जवळचे मित्र होते, त्याकाळातील मामांनी अनेक आठवणींना उजाळा दिला,या वेळी बनसोडे कुटुंबीय भावनिक झाल्याचे दिसून आले. बापू यांच्या पश्चात २मुले,२सुना,४ नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचे एक चिरंजीव तात्याराम बनसोडे सोनाई डेअरी सुपरवायजर येथे काम पहातात तर दुसरे चिरंजीव अशोक बनसोडे हे गौतोंडी येथील दगडूदादा बनसोडे विद्यालय येथे सहशिक्षक म्हणून काम करतात.