
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
सांगली. कडेगांव येथे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये शेत जमिनीच्या सातबारा वरील आणेवारी दुरुस्तीसाठी १५ हजाराची लाच घेताना (खेराडेवांगी) ता.कडेगांव येथील तलाठी मनीषा मोहनराव कुलकर्णी (वय ३७ रा. इस्लामपूर ता. वाळवा) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागांच्या पथकांने सोमवारी दुपारी रंगेहाथ पकडले. सौ. मनीषा कुलकर्णी या खेराडेवांगी या गावांमध्ये तलाठी म्हणून काम पाहतात. तक्रारदारांच्या वडिलांची जमीन शासनांने पुनर्वननासांठी संपादित केली होती. भूसंपादनावेळी सातबारा उताऱ्यावरील चुकीची नोंद झाली होती. त्यात दुरुस्ती करावी यासाठी तक्रारदारांने तलाठी सौ. मनीषा कुलकर्णी यांच्याकडे अर्ज केला होता. यावेळी तलाठी कुलकर्णी यांनी तक्रारदारांकडे २० हजारांची लाच मागितली. यामध्ये तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्यांचे निश्चिंत झाले. याबाबत तक्रारदारांने लाचलुचपत प्रतिबंधक विभागांशी संपर्क साधला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागांने तक्रारदारांची पडताळणी करून खेराडेवांगी ग्रामपंचायत कार्यालयांत सापळा रचला आणि तक्रारदाराकडूंन १५ हजारांची लाच घेताना तलाठी मनीषा कुलकर्णी यांना पथकांने रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरोधांत कडेगांव पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यांची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईमध्ये पोलीस उपाधीक्षक सुजय घाडगे ,पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी पोलीस हवा अविनाश सागर, सीमा माने,संजय सपकाळ प्रीतम चौगुले, स्वप्निल भोसले यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.