
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
(मोताळा/प्रतिनिधी) :- तालुक्यात परतीच्या भयंकर पावसाने शेतकऱ्यांच्या मका, सोयाबीन, कापूस, उडिद, मुंग आदि पिकांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, खरीपाचा हंगाम सुरु झाला आहे. मका, सोयाबीन कापनी, कापूस वेचाई सध्या संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. एकीकडे मजूरवर्ग न मिळत असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. मका सोंगण्यासाठी एका हेक्टरला तब्बल ९ ते १० हजार रुपये द्यावे लागत आहे, कापूस वेचण्याला १ हजार रुपये प्रतिक्विन्टल मजुरी द्यावी लागत आहे. ऐवढे असुन सुद्धा मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्याने मका, सोयाबीन सोंगुन ठेवलेले आहे. अशातच दि.११ आक्टोबर रोजी दुपारी झालेल्या पावसामुळे त्या पिकांचे खुप नुकसान होऊन हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हेरावुन घेतला आहे. एकीकडे उन्हाळ्यापासुन शेतकरी आप आपल्या शेतात राब राब राबतो व्याजाने पैसे आणून पेरणी करतो, नामांकित कंपन्यांच्या औषधांची फवारणी करतो, जास्त पैसे देऊन कसेतरी रासायनिक खते देतो, निंदन, खुरपन, वाह्या देऊन एका एका झाडाला आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे लहानाचं मोठं करतो तेव्हा कुठे त्याच्या मेहनतीचं फळ मिळते ते फळ मिळणारच, अशातच शेतकऱ्यांच्या घरात कापूस, सोयाबिन, मका आदी पिके येणारच अशा स्थितीत सरकारने, मजुराने, व्यापाऱ्याने, लचके तोडल्यावर आता निसर्गाने देखील अती बरसात करुन शेतकऱ्यांचे लचके तोडले आहे. अशा ह्या बिकट परिस्थितीत शासनाने बारामाही अन्न पुरवणाऱ्या शेतकऱ्याला मदत करण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी करत आहे.
प्रतिक्रिया:-
“अति मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे माझी शासनाला विनंती आहे की, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात न जाता शासनाने कोणतेही पंचनामे न करता त्यांना सरसकट मदत जाहीर करुन येत्या दिवाळीला त्यांच्या कुटुंबात प्रकाश टाकावा. (-शुभम घोंगटे, (शेतकरीपुत्र, आव्हा)