
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड- गोविंद पवार
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अधिसभा व्यवस्थापन गटातुन नवनाथ चव्हाण विजय झाला असून नवनाथ (बापू) रोहीदास चव्हाण यांचा विजय म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा महाराष्ट्रातील पहिला विजय आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड च्या व्यवस्थापन प्रतिनिधी पदाच्या (महाविद्यालयीन संस्थाचालक) गटातील निवडणूक दि.९ ऑक्टोबर २०२२२ रोजी नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली येथील एकूण चार केंद्रांवर अतिशय शांततेत पार पडली.आज दि.११ ऑक्टोबर २०२२ रोजी लागलेल्या निकालात नवनाथ (बापू) रोहिदासजी चव्हाण यांचा प्रतिस्पर्धी गटावर मात करत दणदणीत विजय झालेला आहे.१९९४च्या नामांतर लढ्यानंतर मराठवाड्यातील दुसरे विद्यापीठ स्थापनेपासून ते आजतागायत इतर पक्षांची असलेली एकहाती असलेली सत्ता मोडीत काढत तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ (बापू) रोहिदास चव्हाण यांनी महाराष्ट्रातील पहिला विजय मिळवला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नांदेड जिल्ह्यातील युवा सेना नेते नवनाथ (बापू) रोहिदास चव्हाण हे गेली पाच वर्षे पंचायत समिती,जिल्हा नियोजन समिती सदस्य पदाची धुरा सांभाळत आपल्या कामाची चुणूक दाखवून देत.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अधिसभा व्यवस्थापन गटातुन यांनी पुन्हा एकदा आपले मराठवाड्यात असलेले वर्चस्व सिद्ध करत महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे.
नवनाथ (बापू) चव्हाण यांच्या झालेल्या विजयाबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण,प्रा.पुरुषोत्तम धोंडगे,प्राचार्य अशोक गवते,नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण,माजी सरपंच भीमराव पाटील शिंदे, अमोल पा ढगे , महाराष्ट्र ग्रामीण बँक मॅनेजर अमोल चव्हाण मुख्याध्यापक मधुकर पवार सर ,सहशिक्षक विनोद गवते, सहशिक्षक विष्णुकांत शिंदे सहशिक्षक देवीदास एडके उद्योजक भीमाशंकर कापसे, शिव पाटिल काकडे आदींनी तालुकाभरासह जिल्हाभरातुन शुभेच्छांचा प्रत्यक्ष , सोशल मीडियाव्दारे , वर्षाव करण्यात आला.