
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी -कवि सरकार इंगळी
गुरुकुल कॉलनी जवाहरनगर इचलकरंजी या कॉलनीतील सर्व सदस्यांनी मिळून कोजागिरी पौर्णिमा अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. यासाठी कॉलनीतील विविध विद्यार्थांचे,त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल व जेष्ठ लोकांनी केलेल्या त्यांच्या कार्याबद्दल सत्कार सोहळा आयोजित केला होता .संगीत खुर्ची, रेकॉर्ड डान्स , करा ओके गायन भक्तीगीत भावगीत गायन रांगोळी स्पर्धा इत्यादींचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पी डी शिंदे सरस्वती हायस्कूलचे मुख्याध्यापक,उपाध्यक्ष डॉक्टर मिलिंद निगवेकर व खजिनदार धोंडीराम आंबेकर तसेच आपटे वाचन मंदिर इचलकरंजी मधून नुकताच आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार शिंदे सरांना जाहीर झाला डी के टी ई इंजिनिअरीग कॉलेजचे प्राध्यापक अतुल ढवळे सर यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली परदेशी शिक्षण घेण्यासाठी महेंद्र कोरवी व रानटी ह्या लघु चित्रपटात झी चैनल करून मिळालेल्या यशाबद्दल गिरीश कोरवी या चौघांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात श्री श्रीकांत फातले हे राष्ट्र सेवा सघ महत्त्व आणि कार्य स्पष्ट या विषयी माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन ग्रामीण कथाकार कृष्णात कोरवी यांनी केले असून संपूर्ण नियोजन गोविंदराव हायस्कूलचे अध्यापक प्रकाश डोईफोडे सर यांनी केले. कार्यक्रमांमध्ये गुरुकुल कॉलनीतील 75 सदस्यांनी सहभाग दर्शवला असून सालाबाद प्रमाणे ही येणाऱ्या दिवाळीमध्ये प्रदूषण विरहित म्हणजेच इको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे फटाके मुक्त दिवाळी तसेच होळी महान व पोळी दान करण्याचा ही निर्णय घेतला आहे कॉलनीतील एकोपा रहावा बंधुभाव वाढवा अशा प्रकारचे विचार स्नेहल कदम यांनी मांडले. कार्यक्रमाचे आभार सलील खारगे यांनी केले. वंदेमातरम या गितांनी कार्यकमाची सांगता होऊन स्नेहभोजन व गोड स्वादिष्ठ दूधाचा ही आस्वाद सर्वाना देणेत आला.