
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
एक काळ असा होता कि अंगभर कपडा मिळणं कठीण होतं . अगदी राजे महाराजे, सेनापती, विशिष्ट लोक यांचा पेहराव वेशभूषा हि लक्षणीय आकर्षक असायची पण आज परस्थिती बदलली आहे. प्रत्येक व्यक्ती हवे तसे कपडे ,हवे ते अंलकार घालू शकतो.आणि आपली वेशभूषा जबरदस्त पद्धतीने आकर्षक बनवु शकतो पण वेशभूषा नाही तर वैचारीकता हेच आदर्श व्यक्तिमत्वाच लक्षण आहे .आपण इतिहासाचा मागोवा घेतला तर लक्षात येईल अनेक महापुरुष योगी तपस्वी सिद्धपुरूष होऊन गेले कि त्यांच्या विचारांचा प्रभाव लोकांवर आजपर्यंत टिकुन आहे.भविष्यात पण राहिल .पण हल्ली विचारां ऐवजी लोक वेशभूषा पाहुण प्रभावित होतात हे वास्तव आहे. प्रगती करण पुढं जाणं हा सगळ्यांचा अधिकार आहे पण मार्ग हा आप आपल्या इच्छा नुसार निवडायचा असतो.प्रत्येकजण जीवनात आपण एखाद्या क्षेत्रात तरी आपलं नावलौकिक केल पाहिजे यासाठी अहोरात्र धडपडत असतो . त्यासाठी नानाविध प्रयत्न आणि वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब पण वेळ प्रसंगी केला जातो . एकंदरीत काय तर कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही पद्धतीचे प्रयत्न करून लोक प्रभावित करता आले पाहिजे किंवा झाले पाहिजे हाच अंतिम हेतु असतो . मग भौतिक संसाधन वापरून लोकांना क्षणिक प्रभावित करण्या ऐवजी विचारांनी अनेक पिढ्या प्रभावित होतील असं व्यक्तिमत्त्व होता आलं पाहिजे. आपल्या जीवनातील आवश्यक असणार्या गरजा ज्या मध्ये अन्न वस्त्र ,निवारा या पैकी वस्त्र हि आवश्यक गरज आहे . इथपर्यंत बरोबर आहे.पण वस्त्र वेशभुषा हि आपली परंपरा आहे. पण हल्ली हिच परंपरा फॅशन झाली आहे. वेशभूषा लोकांना प्रभावित करण्याच माध्यम झाली आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे परिधान करण या मध्ये काही गैर नाही. पण हे कपडे हे कोणालाही प्रभावित करण्यासाठी नसले पाहिजे. वास्तविक कपड्यांनी दागिन्यांने लोकांना प्रभावित करण्या पेक्षा आपल्या विचारांनी लोक प्रभावित पाहिजे असं व्यक्तिमत्त्व होता आलं पाहिजे. कपडे ,दागिने,अभुषण,पाहुण तर प्रथम दर्शनी कोणीही सहजासहजी प्रभावित होत .पण हे प्रभावीत होणं क्षणिक असत.फार काळ टिकणार नसतं. सध्या लोक भौतिक संसाधन पाहुण प्रभावित होतात हा वेळेचा प्रभाव आहे आणि कालयुगाच वैशिष्ट्य पण खरया अर्थाने विचाराने संस्काराने लोक प्रभावित होतील असं व्यक्तिमत्त्व होता येण हि सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. कपडे,लत्ते , दागिने, किंवा भौतिक स्वरूपाचे अभुषण परिधान करून पृथ्वीवरील कोणीही लोकांना प्रभावित करू शकत.या मध्ये फार काही अवघड गोष्ट नाही.पण खरं कौशल्य आहे ते विचारांनी लोक प्रभावित झाले पाहिजे असं होता येण .सध्या जग अगदी गतिमान आणि चंचल झालं आहे . आपल्याकडे असणारी भौतिक संपदा किंवा संसाधन हि इतरांना दाखविण्यासाठी जणुकाही स्पर्धा लागली आहे का असंच कधी कधी वाटतं .आपली संपदा हि लोकांना दाखविण्यासाठी नसतीच मुळी , ओळखतील किंवा अनोळखी लोक वेशभूषा दागिने यांनी जितक्या लवकर प्रभावित होतात तितक्या लवकर वास्तविक स्वरूप ओळखतात .पण आपल्या विचारांनी जे प्रभावित होतात ते आयुष्यभर विचारांचे पाईक होतात.महणुन जीवनातील सगळ्यात मोठी गोष्ट बाब हीच आहे कि आपण आपल्या जीवनात कोणत आणि कसं व्यक्तिमत्व झालं पाहिजे.कपडे दागिने परिधान करून क्षणिक आपल्याला मी खुप मोठा आहे,सदन आहे , श्रीमंत आहे,हे सहज पणे दाखवता येईल .पण विचारांची श्रीमंती हि सहज मिळत नाही.त्यासाठी अफाट कष्ट, प्रचंड त्याग, वैचारिक प्रगल्भता, प्रदीर्घ अनुभव, खडतर संघर्ष,या सगळ्या तुन परिपक्व होऊन पुढे जावं लागतं तेव्हा वैचारिक व्यक्तिमत्व घडत आणि जेव्हा वैचारिक व्यक्तिमत्व घडत तेव्हा ते चिरकाल टिकणारे असत . आणि भविष्यातील अनेक पिढ्यांच्या साठी ते प्रेरणादायी असतं .मग कपडे दागिने परिधान करून आपण किती दिवस प्रभावित करणार तर खूप कमी दिवस आणि विचाराने संस्काराने अनेक पिढ्यांच्या साठी आपणं प्रेरणादायी ठरणार म्हणून कपडे दागिने या पेक्षा विचाराने संस्काराने लोकांना प्रभावित करणार व्यक्तिमत्व होण उत्तम
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक9011634301