
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:देगलूर तालुक्यातील शिवणी या गावांमध्ये जागेच्या वादावरून आपापसामध्ये मध्ये हाणामारी झाली दि. 10.10 2022 रोजी सकाळी अंदाजा 11.30 वाजता शिवणी बस स्टॅन्ड येथे घटना घडली
देगलूरला बाजार करण्यासाठी येत असताना, त्याठिकाणी यादव गुंडेराव उप्पलवार वय-45 वर्ष रा शिवणी ता. देगलूर हा माझ्या जवळ आला आणि म्हणाला कि माझ्या जागेत तु लाकुड फाटा का टाकत आहेस, मला तुझ्याहिस्सेतून आणखी जागा येत आहे, असे म्हणून जागेचा बाद काढून मला बसस्टँडच्या जागेवरच लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. बाजूलाच पडलेले लाकुड घेवून माझ्या गुडघ्यावर व पायाच्या फेंडरीवर मारत होता. तसेच मी बाजारला जाण्यासाठी माझ्या खिशातील रु.3500/- त्याने हिसकावून काढून घेतला त्यावेळी मी आरडा ओरड केलो असता त्याठिकाणी असलेले 1. रमेश लालू सोनकांबळे 2. इरया भुजंग उप्पलवार हे दोघे घटना पाहून त्यानी मला त्याच्या तावडीतून सोडविले नसता माझा त्याने जीव घेतला असता. यादव हा आडमुठ स्वभावाचा असुन कुण्यावेळी काय करील याचा नेम नाही. असे फिर्यादीने मरखेल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे
पुढील कारवाई चालू आहे मरखेल पोलीस स्टेशन ने कळवले