
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
पिंपळदरी :- लोहा तालुक्यातील मौजे पिंपळदरी ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौ़ यमूनाबाई शिवाजी जाधव यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कार्यालय पिंपळदरी येथे उपसरपंच पद रिक्त होते त्या ठिकाणीं यमुनाबाई जाधव यांची निवड करण्यात आली आहे.संतोष पाटील यांच्या वतीने उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सौ.चंद्रकला बाबाराव जाधव, सौ.यमूनाबाई शिवाजी जाधव (उपसरपंच},सौ.सुमनबाई पांडुरंग कांबळे,सौ.कल्पना निरंजन पांचाळ, श्री.तुकाराम मारोती जाधव , सरपंच श्री.संतोष देवराव पाटील जाधव पिंपळदरीकर तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नवनियुक्त उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा संतोष पाटील यांनी सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .