
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
नांदेड : – लोहा तालुक्यासह ग्रामीण भागातील उच्च शिक्षीत व नवीन मतदारांची तात्काळ पदवीधर यादीत नोंदणी करावी अशी मागणी भारतीय बंजारा जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष ॲड विजय पवार यांनी निवेदनाद्वारे लोहा तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
लोहा तालुक्यातसह ग्रामीण भागातील नवीन व पहिल्या काही चुकांमुळे अनेक पदवीधर बांधव पदवीधर मतदानापासून वंचीत असुन त्यांची तात्काळ पदवीधर मतदार यादीत नोंद प्रत्येक गावात करण्यात यावी व पदवीधर मतदानापासून एकही पदवीधर वंचित राहु नाही सदरील अभिमान तालुक्यातील प्रत्येक गावात राबवावे व सर्व पदविकाधारक मतदारांची नोंदणी करावी अशी मागणी भारतीय बंजारा जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष ॲड विजय पवार यांनी लोहा येथील तहसीलदारांकडे केली आहे.