
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -मानिक सुर्यवंशी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ क्रीडासंकुल, नांदेड येथे काल पासून सुरू झालेल्या ‘महा ग्रामीण मेघा स्पोर्ट्स इव्हेंट नांदेड २०२२’ खेळ समारंभाची दिमाखदार आज सांगता झाली. सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन दि.०८ ऑक्टोबर, २०२२ ला भव्य स्वरूपात झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे विद्यमान कुलगुरू डॉ. उद्धव भोसले,
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे उप महापौर अब्दुल गफ्फार यांची विशेष उपस्थिती होती. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे चेअरमन मिलिंद घराड सर, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बीडचे मुख्य महाव्यवस्थापक संजय वाघ सर,महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे,महाव्यवस्थापक विजय मानकर सर यांच्या विशेष नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला. महाराष्ट्र ग्रामीण बँक,लातूरचे विभागीय व्यवस्थापक, ए.एम.कामतकर सर,बीडचे विभागीय व्यवस्थापक, आर.आर.कुरमुडा सर,औरंगाबादचे विभागीय व्यवस्थापक, गणेश पी.कुलकर्णी सर,नाशिकचे विभागीय व्यवस्थापक एस.जे.पाटील सर,पुण्याचे विभागीय व्यवस्थापक, व्ही.एच.गोंधळेकर सर,परभणीचे विभागीय व्यवस्थापक जी.एस.देशमुख सर इत्यादीं मान्यवर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र ग्रामीण बँक, नांदेडचे विभागीय व्यवस्थापक ई.जी.शिंदे सरांनी या समारंभाचे नेटके आयोजन केले होते. स्पर्धेत बुद्धीबळ, बॅडमिंटन,क्यॅरम,क्रिकेट आणि विविध खेळांचे प्रदर्शन खेळाडू कर्मचारीवर्ग करताना दिसून आले. क्रिकेट मधील अंतिम विजेता संघ ठरण्याचा मान एमजीबी आरओ औरंगाबाद संघाकडे मिळाला. पुणे आरओ संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. समालोचन म्हणून सय्यद मुजीब,राहूल यांनी अंतिम क्षणापर्यंत करत राहिले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेमधूनही यापुढे चांगले खेळाडू निर्माण होतील हे माञ निश्चिंत….
●