
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -मानिक सुर्यवंशी
श्री शिवशंकर माध्यमिक विद्यालय वन्नाळी ता देगलुर येथील कलाध्यापक तकवी,गायक बालाजी पेटेकर खतगावकर व मिना रुईकर,नांदेड यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.आर्य वैश्य परिवार व मित्र मंडळ बिलोलीच्या वतीने आयोजित….
सदाबहार गाण्यांची कोजागिरी पौर्णिमेनिमित्त
सुरमयी कोजागिरी
पौर्णिमा विविध लोकप्रिय भक्तीगीत,भावगीते,मराठी,हिंदी नव्या व जुन्या गाण्यांची संगीत मेजवानी सह झाली.या बरोबरच विविध कलागुणांच्या सादरीकरणात चिमुकल्या मुलाच्या सहभाग हा विशेष होता.
09 ऑक्टोबर 2022
रोज रविवारी सायंकाळी 07:00 वाजता कुंचनवार फार्म हाऊस बोधन, रोड,बिलोली येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले.यावेळी श्री व सौ.विजय कुंचनवार,श्री व सौ. अदिनाथ गंगावार,श्री व सौ. तुप्पेवार,श्री व सौ.प्रा.चिद्रावार,पत्रकार तथा मुख्याध्यापक कल्याण गायकवाड सर,श्री व सौ.अरगुलवार,श्री व सौ.लोकमनवार,अदीसह मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचा शेवट सुरूची भोजनाने व चवदार दुधासह कवी बालाजी पेटेकर यांच्या हास्य कवितांनी झाली. कार्यक्रमाचे सुंदर नियोजन सौ.प्रिती कुंचमवार,सौ.प्राजक्ता बासटवार व मंडळाच्या सर्व सदस्यांनी केले.