
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
सध्या उपकाराची परतफेड हि उपकाराने करण्याची स्पर्धा लागली आहे असं वातावरण आहे.पण उपकाराची परतफेड नाही करता आली तरी चालेल पण किमान अपकाराने परतफेड करू नये.हि मानवी वृत्ती नाही उपकार हि वृत्ती आहे व अपकार हि प्रवृत्ती आहे .जे आपल्या मध्ये आहे तेच बाहेर पडत असत मग आपल्या मध्ये काय असलं पाहिजे हे आपल्यावर अंवलबुन आहे . आपल्या मध्ये उपकार वृत्ती असेल तर कोणी कसंही वागु द्या आपण उपकारच करणार कारण ते ठरवुन करता येत नाही. आणि अपकार हे पण तसच आहे . आपल्या मध्ये अपकार असेल तर आपण तसंच करणार कदाचित या मध्ये आपल्यवर उपकार करणाऱ्यांचा हि नंबर लागला तर त्यांच्यावर पण अपकारानेच फेड होईल कारण अपकार आणि उपकार ह्या मानवी प्रवृत्ती आणि वृत्ती आहेत समजुन घेउन दुरूस्ती मुळं ठिकाणी झाली पाहिजे .वरवर दुरूस्ती फार उपयोगी ठरणार नाही म्हणून प्रत्येकाने आपली वृत्ती जागृत ठेवून प्रवृत्ती विकासीत होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे आपण इतिहासाची काही पान पालटली आणि पाहिलं तर लक्षात येईल .उपकारांची परतफेड करण्यासाठी वेळ प्रसंगी स्वतःचे प्राण सुद्धा देणारे याच मातीत जन्माला आलेले अनेक शुर वीर यांचा गौरवशाली इतिहास कुठे आणि सध्याच्या काळात थोड्या फार स्वार्थापोटी क्षणात निष्ठा बदलून उपकारांची परतफेड अपकाराने करणारी माणसं कुठ म्हणजे नेमकं काय चाललंय.लोकांनी नेमका आदर्श काय घ्यायचा आपण नेमके कुठे चाललो आहोत. आणि हिच उपकारांची परतफेड अपकाराने करण्यासाठी चालू झालेली स्पर्धा अशीच विस्तृत रूप धारण करत रहिलीतर मग मात्र समाज व्यवस्था खिळखिळी झाल्याशिवाय राहणार नाही. हे मात्र निश्चित आहे . शेवटी कोणी कस आचरण कराव हा जरी ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय असला तरी नितिमत्ता नावाचा निसर्गाचा संकेत पायदळी तुडवत पुढं जाणं हे मात्र योग्य ठरणार नाही हे पण निश्चित आहे. निसर्गाचा न्याय सरतेशेवटी होतोच म्हणून नैसर्गिक संकेत तरी किमान पाळले गेले पाहिजेत .एक कार्यकाळ असा होता .त्याग ,सत्य, निष्ठा, अभिमान, स्वाभिमान,व इमानदारी प्रकट करण्यासाठी लोकांनी आपल्या जीवनाची बाजी लावली तेव्हा स्वराज्य उभा राहिल . सत्ता, संपत्ती,पद,हि नाकारली वेळ प्रसंगी, सत्ता, संपत्ती,पद , पैसा , नाकारून मृत्यूला कवटाळले पण तरी सुद्धा निष्ठा एक इंच डळमळीत झाली नाही . देशातील इंग्रज यांच्या विरुद्ध झालेला स्वतंत्र लढा आणि या मध्ये सहभागी स्वतंत्र सेनानी यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले आणि देश हित प्रथम म्हणून आपल्या प्राणांची बाजी दिली . ज्या भुमित आपला जन्म झाला त्या भुमिचे उपकार फेडण्यासाठी व या भुमिला इंग्रजांच्या परकियांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी त्यावेळी जो त्याग दाखवलं त्याच फलित आपण स्वतंत्र झालो .पण सध्याच्या काळात जर विचार केला तर कोणीतरी उपकार फेडण्यासाठी प्राणांची बाजी लावेल का तर नक्कीच लावणार नाही .उलट ज्यांनी ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांच्या उपकारांची परतफेड अपकाराने कशी जास्तीत जास्त करता येईल. आणि उपकार करणाऱ्याला पश्चात्ताप करण्याची वेळ कशी येईल याचं दिशेने सध्याच्या काळात लोकांचा कल वाढताना दिसतं आहे.उपकाराची परतफेड कोण जास्ती जास्त अपकाराने करू शकतो याची जणुकाही स्पर्धाच लागली आहे असं वातावरण सध्या झालंय. सर्व साधारण माणसाला हे सगळं कळतंय समजतंय पण आपण सध्या ज्या दिशेने जातोय त्या दिशेने सगळंच तंत्र बदलत आहे . सत्यला क्षणात असत्य सिद्ध केलं जातं आणि असत्याला सत्य सिद्ध केलं जातं . शेवटी काही हि केलं झालं तरी हे क्षणिक समाधान असतं . सत्य हे चिरकाल सत्य असतं . आणि सत्याची बाजू दुबळी होते , कमजोर होऊ शकते .पण शेवटी सत्यमेव जयते असतं .जिंकत ते सत्य म्हणून वेळ काळ प्रभावी असला तरी निसर्ग हा सगळ्यांवर प्रभावी उपाय आहे.तो आपला प्रभाव योग्य वेळी दाखवतोच हे कोणीही विसरून चालणार नाही. उपकार आणि अपकार हे दोन्ही समान अंकी शब्द असणारे वाक्य आहेत.पण परस्पर विरोधी वाक्य असुन जीवनातील खुप मोठं गुपित ह्या शब्दात आहे. आणि त्यातही उपकारांची परतफेड अपकाराने करण्यासाठी विद्यमान युगात स्पर्धा लागली आहे.मीच सगळ्यात जास्त उपकारांची परतफेड अपकाराने कसा करू शकतो यासाठी बहुतांश लोक आपलं विधाता मार्गदर्शक किंवा आपल्या जीवनाचा दिशादर्शक तसेच आपल्या इथं पर्यंत पोहचण्यासाठी कोणाच योगदान होत हे चक्क विसरून ज्याने घडवलं पुढे आणलं संधी दिली , सहकार्य केले त्याच्या विषयी अशभोनिय विधान करून सनसनाटी निर्माण करत आहेत पण हे कितपत योग्य आहे.मुळात जी घटना ज्या वेळी घडली किंवा घडत आहे. त्यावर त्याच वेळेस मत व्यक्त केले पाहिजे .मग नेमकं आपण त्या वेळी गप्प का असतो . ज्याचं अन्न खाल्ल मिठ खाल्ल त्याच निट करावा हा आपल्या संस्कृती चा वसा आणि वारसा आहे.शेवटी वसा आणि वारसा या विरुद्ध जो जातो त्याला एक वेळ पश्चात्ताप करण्याची वेळ नक्कीच येते .पण तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते.महणुन योग्य वेळी उपकार हे अपकारात न बदलता आपली प्रगती,करणं पुढं,जाण, यशस्वी होणं या मध्ये काही गैर नाही पण या मध्ये कुठंही आपल्यावर ज्यांनी उपकार केले त्यांच्या उपकारांची परतफेड अपकाराने झाली नाही पाहिजे एवढंच महत्वाचं.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक9011634301