
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात उद्यापासून टी20 वर्ल्डकपची रणधुमाळी सुरू होणार असून टीम इंडिया विरोधी संघांचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरोधात होणार आहे.
स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळं वर्ल्डकप खेळणार नाहीय. बुमराहच्या जागेवर मोहम्मद शमीला संधी दिल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. शमीने गेल्या तीन महिन्यांपासून क्रिकेट खेळलं नाहीय. तसचं शमीला कोरोनाही झाला होता. त्यामुळे शमीच्या फिटनेसबाबत रोहित शर्माने पत्रकार परिषदेत मोठी अपडेट दिली आहे.
दोन-तीन आठवड्यांपूर्वी मोहम्मद शमीला कोरोना झाला होता. त्यावेळी त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत बोलावण्यात आलं होतं. त्याने मागील दहा दिवसांत खूप मेहनत घेतली आहे. शमी आता ब्रिसबेनमध्ये आहे. तो उद्या आमच्यासोबत प्रशिक्षण घेणार आहे. त्याच्या रिकव्हरी बद्दल ज्या चर्चा आहेत, त्या सकारात्मक आहेत.
त्याने तीन-चार गोलंदाजीच्या सत्रात सहभाग घेतला. मागील 12 महिन्यांपासून आम्ही खेळाडूंच्या प्रबंधनासाठी खूप उपाय केले, मात्र दुखापत होत असते. टीममध्ये जे कुणी आहेत, त्यांना प्रशिक्षण दिलं आहे. दुखापतीमुळं बुमराह वर्ल्डकपमधून बाहेर गेल्यामुळं गोलंदाजी कमजोर वाटत आहे.
रोहित पुढे म्हणाला, टी-20 वर्ल्डकप आवश्यक आहे. परंतु, जसप्रीत बुमराहचा करिअर जास्त महत्वाचा आहे. बुमराहने टीम इंडियासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. दुखापत झाल्यावर तुम्हाला काहीच करता येत नाही. आम्ही बुमराहच्या दुखापतीबाबत तज्ज्ञांसोबत चर्चा केलीय. वर्ल्डकप महत्वाचा आहे पण त्याचं करिअर जास्त महत्वाचं आहे. तो 27-28 वर्षांचा आहे. आम्ही धोका पत्करू शकत नाही.
त्याला अजून खूप क्रिकेट खेळायचं आहे. त्याची कमी आम्हाला वर्ल्डकपमध्ये जाणवेल.जसप्रीत बुमराह दुखापतीमुळं वर्ल्डकपमध्ये खेळणार नसल्याची घोषणा बीसीसीआयने 3 ऑक्टोबरला केली होती. बुमराह ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे. तो राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत उपचार घेत आहे.