
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“”””””””””””””'””””””
परभणी : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी शहरातील १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयास रुपये आठ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
सन २०१९ मध्ये मंजूर स्त्री रुग्णालयाचे बांधकाम सन २०२० पर्यंत पूर्णत्वास जाणे अपेक्षित होते. तथापि निधीअभावी रखडलेले काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेले जावे यासाठी उर्वरित निधी तात्काळ मंजूर केला जावा यासाठीची मागणी राष्ट्रवादी चे विधानपरिषद सदस्य बाबाजानी दुर्रानी यांनी लावून धरली होती. त्यांनी हा विषय सभागृहात ही उपस्थित केला होता. त्याच अनुषंगाने आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ना. सावंत यांनी सदरील नमूद निधी जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून मंजूर केला गेला ज्यामुळे नियोजित रुग्णालयाचे प्रलंबित काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेणे सोईचे होऊ शकेल.
सदर रुग्णालयाचे प्रलंबित काम पूर्ण झाल्यानंतर जिल्हाभरातील महिलांना त्याचा लाभ घेता येईल. पालकमंत्री हे स्वतः डॉक्टर असल्याने ते जातीने या कामात लक्ष घालतील असा विश्वास व्यक्त केला गेल्यास वावगे ठरु नये.