
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- पोलीसांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासोबतच होमगार्ड जवानांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पोलीस बॉईज असोसिएशन अंतर्गत होमगार्ड संघर्ष समिती चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.रवीजी वैद्य यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र अध्यक्ष मा.श्री.निलेशजी पगारे यांनी अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष पदी श्री.श्रीकांत नाथे यांची निवड केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत नाथे यांचा जिल्ह्यात विविध भागात सत्कार घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच संस्थापक अध्यक्ष मा.श्री.रवीजी वैद्य आणि महाराष्ट्र अध्यक्ष मा.श्री.निलेशजी पगारे यांचे आभार व्यक्त करत होमगार्ड संघर्ष समितीचे अमरावती जिल्हाध्यक्ष श्रीकांत नाथे म्हणाले की,होमगार्ड जवानांना वर्षाकाठी केवळ मोजकेच दिवस काम मिळते.कायमस्वरूपी ३६५ दिवस काम मिळावे अशी होमगार्ड जवानांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे आणि त्यासाठी जिल्ह्यातील तळागळातील होमगार्ड जवनांपर्यंत पोहचून होमगार्ड संघर्ष समितीद्वारे त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव तत्पर असणार असल्याचे यावेळी होमगार्ड संघर्ष समिती अमरावती जिल्हाध्यक्ष श्रीकांत नाथे यांनी म्हटले.