
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- भूम,परंडा व वाशी तालुक्यात दररोजच्या संततधार अतिवृष्टीमुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे तसेच इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी माजी आ.राहुल मोटे यांनी केली आहे. यासंदर्भात आपण स्वतः शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परतीच्या पावसामुळे प्रामुख्याने शेतीपूरक व्यवसायांचे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले देखील मोठ्या प्रमाणावर खरिपातील इतर पिके वाया गेले आहे. फळबागा,फुलबागा व कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे.काही दिवसापूर्वी घाटनांदूर ता भूम येथे महिलेच्या अंगावर वीज कोसळून दुर्दैवी मृत्यु झाला.याशिवाय काही नागरिकांची दुर्दैवीरित्या मृत्युमुखी पडले,त्यांच्या राहती घरेही या पावसात पडली. कुटुंबीयांना शासनाने मदत करणे गरजेचे आहे. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी स्वतः शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे मोटे यांनी सांगितले.