
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर:तेलंगणा सिमेवर असलेल्या भागात आगामी निवडणुक लढविणार असल्याची हालचाली टिआरएस ने सुरु केल्या असून त्यासंदर्भात तेलंगणातील बासर येथे पहिली बैठक शंकर पाटील होठे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. प्रथम धर्माबाद तालुक्यात अधिक लक्ष दिले असुन आगामी निवडणुकीत टिआरएस सीमावर्ती भागात उतरणार असल्याने अनेक गावांचा पाठिंबा या पक्षाला मिळत आहे. या बासर येथे झालेल्या बैठकीत धर्माबाद तालुक्यातील 25 ग्राम पंचायतीचे प्रमुख, व सरपंच, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते. तेलंगणातील केसीआर सरकारने नुकतेच बी. आर. एस. नावाच्या राष्ट्रीय पार्टीचे उद्घाटन केल्याने आता ही तेलंगणा राष्ट्र समिती भारत राष्ट्र समिती या नावाने ओळखल्या जाणार असल्याने भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून तेलंगणा सरकार तेलंगणातल्या विविध योजना महाराष्ट्रात व भारतातल्या इतर राज्यात राबवणार असल्याचा दावा तेलंगणा राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला आहे. धर्माबाद तालुक्यातील यापूर्वीही अनेक सरपंचांनी व ग्रामस्थांनी तेलंगणा सरकारच्या विविध कार्यावर प्रभावित होऊन तेलंगणामध्ये आम्हाला समाविष्ट करून घ्या ह्या मागणीसह थेट तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांच्यापर्यंत शिष्टमंडळाची भेट घेतली होती या बातमीची दखल घेऊन तात्कालीन महाराष्ट्राच्या
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या सीमावरभागातल्या या सर्व सरपंचांना मुंबई येथे तातडीने बोलवून त्यांच्या समस्या ऐकून घेऊन पन्नास कोटीचा तातडीचा निधीही जाहीर केला होता परंतु या सगळ्या घोषणा हवेतच विरल्या त्यामुळे सीमावरती जनतेचे प्रश्न जसेच्या तसे आजही तेच आहेत. महाराष्ट्रातला मराठवाडा आणि मराठवाड्यातला नांदेड जिल्ह्यातील सीमा वरती भाग असणारा तेलंगणाच्या सीमेलगत असणाऱ्या गावांना अजून पर्यंत पंच्याहत्तर वर्षानंतर मूलभूत सुविधा सुद्धा मिळत नसल्याचे जनतेचा हा आक्रोश असल्याचेही या बैठकीचे आयोजक शंकर पाटील यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील वाढता भ्रष्टाचार रस्त्याच्या दुरावस्था पाण्याच्या दुरावस्था या सर्व गोष्टीपेक्षा तेलंगणा सरकारच्या योजना किती प्रभावशाली आहेत आणि प्रांत रचना होण्याच्या अगोदर हा संपूर्ण परिसर निजामकालीन हैदराबाद स्टेट मध्ये येत होता व तत्पूर्वी ही मुधोळ हा आपला तालुका होता कदाचित आपण तेलंगणात राहिलो असतो तर सुजलाम सुफलाम झालो असतो व राज्य शासनाच्या अनेक महत्त्वकांक्षी निर्णयाचे लाभार्थी ही झालो असतो असेही शंकर पाटील होटे यांनी यावेळी सर्व सरपंचांना संबोधित करताना सांगितले या बैठकीला तेलंगाना राष्ट्र समितीचे बासर मंडळ प्रमुख व तेलंगणा राज्य बासर येथील मंडळ अध्यक्ष शाम कोरवा, तेलंगणा आणिमहाराष्ट्राचा समन्वय करून देणारे मलकापूर लिंगा रेड्डी (चिन्ना दोरा ) बासर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते कोरवा सदानंद अण्णा, माजी नगरसेवक रवींद्र शेट्टी सरपंच संघटनेचे अध्यक्ष निदानकर सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार जी. पी. मिसाळे यांची उपस्थिती होती. यावेळी तेलंगणा सरकारच्या विविध योजनांची माहिती बासर मंडल चे प्रमुख शाम कोरवा, यांनी उपस्थित सरपंचांना दिली. यावेळी अनेक सरपंचांनी आपले मनोगत व्यक्त केले व विविध विकास कामापासून आपण कसे वंचित आहोत व तेलंगाना सरकारच्या योजना किती प्रभावशाली आहेत हाच सूर सर्व सरपंचाच्या भाषणातून उमटत होता. शेवटी सर्वांनी एकमताने आपले विचार निर्णय घेऊन भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या अंतर्गत आपण काम करायच्या व येणाऱ्या आगामी निवडणुका सुद्धा या पक्षाच्या अंतर्गतच लढवल्या पाहिजेत असाही निर्णय या बैठकीमध्ये झाला आहे. या बैठकीचे आयोजक शंकर पाटील होटे आणि तेलंगणातील अनेक ज्येष्ठ पत्रकार सीमावर्ती भागातील धर्माबादचे अनेक पदाधिकारी सरपंच लोकप्रतिनिधी, अनेक पत्रकार या बैठकीला उपस्थित होते.