
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
मुंबई –सध्या महागाईने चांगलेच तोंड वर काढले असून. या महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दिवाळीमध्ये खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. ऐंन दिवाळीमध्ये एसटी महामंडळाकडूंन भाडेवाढ करण्यांचा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजीच्या दरामध्ये चांगलीच वाढ झाल्यांने आता प्रवास खर्च महागणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या दहा दिवसांमध्ये १०/ टक्के हंगामी तत्त्वांवर भाडेवाढ करण्यांचा निर्णय एसटी महामंडळाने चांगलाच घेतला आहे. तिकीट दर २० ऑक्टोंबर मध्य रात्रीपासून लागू करण्यांत येणार आहे. एसटीने ५ ते ७४ रुपयापर्यंतची दरवाढ केली असून आता. दादर-स्वारगेट मार्गावर सध्या २२५ रुपये दर आहे. तो यापुढे २६० रुपये एवढा असणार आहे. तर शिवशाही गाडीसाठी ३५० असलेला दर आता ३८५ रुपये इतकी वाढ करण्यांत येणार आहे. अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.