
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
दिनांक 15 ऑक्टोबर डॉ.अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस “वाचन प्रेरणा दिवस” तसेच आंतररष्ट्रीय हात धुवा दिवस निगडी शाळेत शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांच्या उपस्थित साजरा करण्यात ग्रंथ दिंडी काढून आणि हात धुवून साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.संतोष पाटेकर यांनी वाचनाचे महत्व सांगताना दररोज 1 तास पुस्तक वाचावे असे सांगितले.
तर सरपंच श्री.महादेव पाटील साहेब यांनी हात धुण्याचे तसेच स्वच्छतेचे महत्त्व सांगताना शारीरिक स्वच्छतेबरोबर ,परिसर स्वच्छता महत्त्वाची आहे.आपले आरोग्य चांगले राहिले तर चांगले मन राहील आणि त्यातून चांगली पिढी घडेल असे सांगितले.शाळेचे मुख्याध्यापक श्री.रमेश जाधव यांनी पुस्तक वाचून घडेल आपले मस्तक,घडलेल्या मस्तकासमोर जग होईल नतमस्तक असे सांगून वाचनाचे महत्व सांगितले .आणि स्वच्छतेचे महत्व सांगितले .श्री.गणू बारे गाव अध्यक्ष तसेच श्री.चंद्रकांत शिगवण मुंबई मंडळ अध्यक्ष यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
शाळेत लोकांना वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी गावातून ग्रंथ दिंडी घोषणा देत काढण्यात आली.तसेच भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा आणि वाचन तास असे विविध उपक्रम घेण्यात आल्या.
तसेच आंतररष्ट्रीय हात धुवा दिवस हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास सौ.वेदिका पाखड,सौ. विजया पाटील,सौ.सारिका पोटले,सौ.स्नेहा भुवड,स्वयंपाकी सौ.सुनीता कानसे,सौ.श्रुतिका रेवाळे ,सौ. पाखड इत्यादी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि पालक उपस्थित होते.सदर कार्यक्रम शिक्षक श्री.संदीप जाधव ,श्री.संभाजी जळकोटे तसेच मुख्याध्यापक श्री.रमेश जाधव यांनी यशस्वी पार पाडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कुमार ओमकार भारशिंग यांनी भूषविले . सूत्रसंचालन कु.अमित भुवड तर आभाप्रदर्शन शाळेची मुख्यमंत्री कुमारी कस्तुरी भोजणे हिने केले.