
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक सहा चे कर्तव्यदक्ष लोकप्रिय नगरसेवक नबीसाब शेख यांचा वाढदिवस लोहयात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
नगरसेवक नबीसाब शेख यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा पोलीस स्टेशन समोर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन लोहा नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन १११ जणांनी रक्तदान केले. यावेळी लोहा न.पा.चे गटनेते करीम भाई शेख, नगरसेवक अमोल व्यवहारे, नगरसेवक संदीप दमकोंडवार, नगरसेवक केतन खिल्लारे, सचिन सावकार सुर्यवंशी,गुलामभाई,विनय चंदेवाड, लक्ष्मण फुलवरे आदी उपस्थित होते
तसेच नगरसेवक नबीसाब शेख यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना नबीसेठ मित्रमंडळाच्या वतीने फळे वाटप करण्यात आले.
तसेच नगरसेवक नबीसाब शेख यांच्या वाढदिवसानिमित्त लोहयात त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात डिजिटल बॅनर व कमानी लावण्यात आल्या.
नगरसेवक नबीसाब शेख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी , जेष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले, नगरसेवक अमोल व्यवहारे, नगरसेवक संदीप दमकोंडवार, नगरसेवक केतन खिल्लारे, हळदवचे माजी सरपंच भीमराव पाटील शिंदे, अरविंद राठोड, यांच्या सह अनेक मान्यवरांनी अभिष्टचिंतन करून शुभेच्छांचा वर्षाव केला.रंगी बेरंगी फटाक्यांची आतिषबाजी केली.