
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
मुंबई. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार २१ ऑक्टोंबर पूर्वी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारनं ८९ हजार एसटी कर्मचाऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला. तसेच आणखीन एक निर्णय याबाबत मोठा घेण्यात आला एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ४५ कोटी रुपयांची मोठी घोषणा सरकारने केली आहे. एसटीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून हा निधी दिला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळातील ८९ हजर अधिकारी कर्मचारी वर्ग ज्या निर्णयाची वाट पाहत होते. अखेर या निर्णयावर राज्य सरकारने निर्णय घेतला. दिवाळी भेट म्हणून एसटी महामंडळाला ४५ कोटी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला या निधीतून एसटी कर्मचाऱ्यांना 5000 रुपये आणि कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये अशी दिवाळी रक्कम या निधीतून मिळणार आहे.