
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे –भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या ९१व्या जयंती निमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजीत डॉ.कलाम युवा प्रेरणा पुरस्कार २०२२ व डॉ.कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा सन्मान सोहळा २०२२ शानदार दिमाखात संपन्न झाला.या पुरस्कार वितरण सोहळ्यात पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड च्या स्वारगेट डेपोत कार्यरत असलेले बस कंडक्टर श्री. प्रशांत भोसले यांना २०२२ चा डॉ.कलाम युवा प्रेरणा पुरस्कार कक्ष प्रमुख मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता समिती विशेष कार्याधिकारी या.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ओ एस डी मा.श्री मंगेशजी चिवटे यांचे हस्ते सन्मान चिन्ह सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
परिवहन क्षेत्रात कार्यरत असलेल्या बस कंडक्टरला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणे हिच राष्ट्र उभारणीसाठी मिळालेली खूप मोठी प्रेरणा आहे.याच कार्याची दखल घेऊन २०२२चा डॉ.कलाम युवा प्रेरणा पुरस्काराने प्रशांत भोसले यांना सन्मानित करण्यात आले.
मा.श्री काशिनाथजी भतगुणकी , संस्थापक अध्यक्ष ड्रिम फाऊंडेशन व मा.सौ संगिताजी पाटील, संचालिका डॉ कलाम मिशन यांनी हा सन्मान सोहळा आयोजित केला होता.महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून राष्ट्राला उभारणी देणाऱ्या व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या हिऱ्यांची निवड करुन त्यांना सन्मानित करण्यात आले.
या सन्मान सोहळ्यात मा.डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहासंचालक यशदा पुणे.मा.डॉ.बबन जोगदंड, प्रभारी अधिकारी माध्यम व प्रकाशन केंद्र, यशदा, पुणे.मा.श्रीचचच मंगेशजी चिवटे,कक्ष प्रमुख वैद्यकीय सहाय्यता समिती, विशेष कार्याधिकारी मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ओएसडी.मा.श्री संजय आवटे, संपादक दैनिक लोकमत, पुणे.मा.श्रीनवनाथ येवले डायरेक्टर येवले अमृततुल्य पुणे.मा.श्री दत्तात्रय निडवंचे, डायरेक्टर नादब्रह्म इडली.मा.श्री चंद्रकांत निनाळे, सहसंचालक व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, पुणे.इ.मान्यवर उपस्थित होते.
या शानदार सोहळ्याचे सुत्रसंचलन मा.श्री काशिनाथ भतगुणकी सर यांनी आपल्या मधुर वाणीने केले.तर मा.सौ.संगिताजी पाटील यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.