
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर
जातीय व्देष भावनेतून पदोन्नती नाकारली असून छोटूभाई पटेल हायस्कूलच्या व्यवस्थापन समितीवर अॅट्राॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा या प्रमुख मागणीसाठी सहाय्यक शिक्षक अशोक तुमराम हे गेल्या १७ऑक्टोंबर पासून स्थानिक जिल्हा परिषद कार्यालया समोर बेमुदत उपोषणाला बसले होते .शेवटी आज या उपोषणाला यश प्राप्त झाले. दरम्यान पटेल हायस्कूलच्या व्यवस्थापन समितीच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी आज गुरुवारी दुपारी उपोषण मंडपात भेट देत तुमराम यांचे रास्त मागण्यांची सोडवणूक केली . केलेल्या मागण्या पूर्ण झाले मुळे अशोक तुमराम यांनी सुरु असलेले आपले बेमूदत उपोषण संपविले. आहे. .गेल्या २८वर्षांपासून अशोक तुमराम हे छोटू भाई पटेल हायस्कूल मध्ये शिक्षक पदावर कार्यरत आहेत.दि.३१ऑगस्ट २०२२ला उप प्राचार्य पद सेवा निवृत्तीमुळे (ते) रिक्त झाले होते .दि.१सप्टेंबर २०२२ पासून सेवा ज्येष्ठता नियमानुसार उपप्राचार्य म्हणून अशोक तुमराम यांची नेमणूक व्हायला हवी होती परंतू तसे झाले नाही. आपणांस न्याय मिळावा यासाठी अशोक तुमराम हे तीन दिवसांपासून बेमूदत उपोषणाला बसले होते . दरम्यान तुमराम यांचे उपोषणाला जाहिर पाठिंबा देत बिरसा क्रांती दलच्या एका शिष्टमंडळाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची काल बुधवारला दुपारी भेट घेत त्यांना एक मागण्यांचे निवेदन सादर केले होते. या वेळी बिरसा क्रांती दलचे अध्यक्ष अशोक उईके, महासचिव जितेश कुळमेथे , मधूकरराव कोडापे, महिला अध्यक्ष रंजना किन्नाके , शारदा मेश्राम,चंद्रपूरचे जेष्ठ पत्रकार किशोर पोतनवार ,मारोती जुमनाके , कपूर आत्राम,कमलेश आत्राम,राजेन्द्र धूर्वे ,गौतम गेडाम , वामन मेश्राम आदीं उपस्थित होते.