
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
***********
परभणी : येथील पोलीस मुख्यालयात आज शुक्रवार, दि. २१ ऑक्टोबर २२ रोजी सकाळी ठिक नऊ वाजता पोलीस स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी पोलीस अधीक्षक जयंत मीना, सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची उपस्थिती लाभली होती.
२१ ऑक्टोबर हा शहीद दिवस मानला जात असल्याने दरवर्षी कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलीस बांधवांचे स्मरणार्थ आजच्या दिवशी हा स्मृतीदिन साजरा केला जातो.
परभणी पोलीस मुख्यालयातील या कार्यक्रमात प्रारंभी शहीद पोलीस बांधवांच्या स्मरणार्थ हवेत गोळ्या झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी स्मृतीस्थळ व परिसर सुशोभित करण्यात आले होते. पारंपारिक पोलीस बॅन्ड पथकाद्वारे गीत गाऊन हा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी भरगच्च अशी पोलीस बांधवांची उपस्थिती होती.