प्रतिनिधी : स्वाती हडकर
रत्नागिरी : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील खान कंपनीत मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे.
या स्फोटात ४ ते ५ कामगार आगीत होरपळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
जखमी कामगारांना तातडीने लोटे येथील परशुराम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले असून पुढील मदत व बचावकार्य सुरू आहे.
